Almost Suphal Sampurna

नुकतंच मालिकेत नचिकेत आणि सईचा साखरपुडा झाला. या साखरपुड्यासाठी सईला आजी आणि काकी अगदी छानपैकी तयार करतात. आता सई आणि नचिकेतच्या लग्नाचा बार कधी उडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

  ४०० भागांच्या यशस्वी प्रवासानंतर ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मध्ये तो सुवर्ण क्षण आला. मालिकेतील प्रमुख व्यक्तिरेखा सई आणि नचिकेत यांच्या प्रेमाचा प्रवास प्रेक्षकांनी तर जवळून पाहिलाच पण त्याचसोबत अप्पा आणि इरा यांनी त्या दोघांमध्ये आणलेले अडथळे पाहण्यात देखील प्रेक्षक चांगले गुंतले होते. अप्पा आणि इरा यांनी शर्थीचे प्रयत्न केले नचिकेत आणि सईला एकमेकांपासून वेगळं करण्याचे पण त्यांची सगळी मेहनत वाया गेली. अखेर सई आणि नचिकेत एकत्र आलेच.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Zee Yuva (@zeeyuva)

   

  नचिकेतचे वडील रवी देशपांडे यांच्या एन्ट्रीमुळे मालिकेने एक रंजक वळण घेतलं. पळून गेलेले सई आणि नचिकेत, नचिकेतच्या वडिलांना भेटतात आणि अप्पा व इराकडून सई आणि नचिकेतच नातं मान्य करून घेण्याची जबाबदारी ते घेतात. नचिकेत आणि सई घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा साखरपुडा करून देण्याच अप्पा आणि इरा काबुल करतात.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Zee Yuva (@zeeyuva)

   

  नुकतंच मालिकेत नचिकेत आणि सईचा साखरपुडा झाला. या साखरपुड्यासाठी सईला आजी आणि काकी अगदी छानपैकी तयार करतात. आता सई आणि नचिकेतच्या लग्नाचा बार कधी उडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Zee Yuva (@zeeyuva)