जाऊ डबल सीटवर लांब लांब….पण  यासाठी नचिकेतला करावी लागतेय तारेवरची कसरत!

झी युवावरील ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या लोकप्रिय मालिकेला प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या भरगोस प्रतिसादामुळे  मालिकेने नुकताच ३५० भागांचा यशस्वी टप्पा गाठला. या मालिकेतील नचिकेत, सई आणि अप्पा केतकर या तीन व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी त्यांच्या मनात कायमची जागाही दिली आणि या कलाकारांवर प्रेक्षक व चाहते प्रेमाचा वर्षाव करतात.

View this post on Instagram

A post shared by Nikhil Damle (@nikhil_damle)

सध्या मालिकेत प्रेक्षक सईची नचिकेतवर होणारी चिडचिड पाहत आहेत आणि त्याला कारणीभूत कोण आहे हे देखील प्रेक्षकांना माहिती आहे. पण हे सई आणि नचिकेतमध्ये खटके उडण्यामागे कोण आहे हे त्या दोघांना मालिकेच्या कुठल्या टप्प्यावर कळेल हे प्रेक्षकांना पाहण्यासाठी थोडा धीर धरावा लागेल. पण सध्या मालिकेच्या चित्रीकरणात एक मजेशीर गोष्ट घडतेय जी प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. मालिकेतील एका सिनमध्ये नचिकेतला सायकलवर सईला डबलसीट घ्यायच आहे. हा सिन शूट करण्याची मजाच वेगळी होती करत नचिकेत म्हणजेच अभिनेता निखिल दामले याला खऱ्या आयुष्यात डबलसीट घेऊन सायकल चालवता येत नाही आणि चित्रीकरणासाठी हे आव्हान निखिलला पेलायचं होतं. त्यामुळे शूटिंग दरम्यान फावल्या वेळात निखिलने डबलसीट घेऊन सायकल चालवायचा सराव केला. हा अनुभव निखिलसाठी खूप मजेशीर होता.

View this post on Instagram

A post shared by Nikhil Damle (@nikhil_damle)

याबद्दल बोलताना निखिल म्हणाला, “मला सायकल चालवता येते आणि लहानपणी मी सायकल घेऊनच शाळेत जायचो पण मी या आधी कधीच डबलसीट घेतली नव्हती. त्यामुळे जेव्हा मालिकेच्या सीनसाठी डबलसीट घेऊन सायकल चालवायची आहे असं मला कळलं तेव्हा मला थोडी धडकी भरली. मी सेटवरच फावल्या वेळात सायकलवर डबलसीट चालवायचा सराव केला आणि मग चित्रीकरणासाठी सज्ज झालो. ऑलमोस्ट सुफळ संपूर्णच्या आत्तापर्यंतच्या प्रवासात या सिनसाठी केलेलं शूटिंग मी कधीच विसरणार नाही.”

View this post on Instagram

A post shared by Nikhil Damle (@nikhil_damle)