मी पोहोचण्याच्या १२ मिनिटांआधी तिने प्राण सोडला, अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहीत व्यक्त केली खंत!

७९ वर्षीय कैलाश वर्मा ११ एप्रिल रोजी घरात घसरुन पडल्या होत्या. दोन दिवसांनी त्यांना नोएडातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    क्योंकि सास भी कभी बहु थी, कहता है दिल, ना आना इस देस लाडो, देवी यासारख्या टीव्ही मालिका, खुलजा सिम सिम, जादू यासारख्या मालिकांमधून पुढे आलेला अभिनेता अमन यतन वर्मा याची आई कैलाश वर्मा यांचं १८ एप्रिलला निधन झालं. कोरोना संसर्गाच्या काळात आपली आईशी नीट भेटही होऊ शकली नव्हती. मी चित्रिकरणात व्यस्त असल्यामुळे आईची भेट घेणं टाळत होतो. माझ्यामुळे तिला कोरोना संसर्ग होऊ नये असं वाटत होतं. आता ती गेली. मी हॉस्पिटलला पोहोचण्याच्या १२ मिनिटांआधी आईने प्राण सोडला, या गोष्टीची बोचणी आयुष्यभर राहील, अशा शब्दात अमन यतन वर्माने आपल्या भावनांना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by aman yatan verma (@amanyatanverma)

    ७९ वर्षीय कैलाश वर्मा ११ एप्रिल रोजी घरात घसरुन पडल्या होत्या. दोन दिवसांनी त्यांना नोएडातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. “आईची कोरोना चाचणी निगेटिव्ह होती. हायपरटेंशन आणि स्थूलता यासारखे आजार तिला होते. पाच दिवसांनी शरीरातील प्राणवायू धोक्याच्या पातळीवर आला आणि अघटित घडलं.” असं अमनने पोस्टमध्ये लिहिलं आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by aman yatan verma (@amanyatanverma)

     

    “नोएडातील स्मशानभूमीत मला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीषणता जाणवली. रुग्णवाहिकांच्या रांगा पाहणं हृदयद्रावक आणि तितकंच भीतीदायकही होतं. अंत्यसंस्कार हा पवित्र विधी आहे. मात्र विद्युतदाहिनीला इतकी गर्दी झाली, की त्यांना कोरोनाग्रस्त आणि नॉन कोव्हिड अशा दोन्ही मृतदेहांवर एकत्र अंत्यसंस्कार करावे लागले. हे घाबरवणारं होत. आपल्या देशात काय चाललंय, त्याबद्दल कोणीच बोलत नाहीये. गोष्टी हाताबाहेर जात आहेत. वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे तरुणही कोरोनामुळे बळी पडत आहेत. रोजच सहकारी आणि समवयस्क लोकांच्या मृत्यूच्या वार्ता कानावर पडत आहेत. सर्वांसाठीच हा कठीण काळ आहे. हा एक असा कालखंड आहे, जो संपूर्ण जग एकत्रित लक्षात ठेवेल” अशा भावना अमन वर्माने व्यक्त केल्या आहेत.