अमेझॉन प्राइमने केली ‘बंदिश बँडिट्स’ सीरिजची घोषणा, ४ ऑगस्टपासून पाहता येणार

अमेझॉन प्राइम व्हिडिओने आज त्‍यांची नवीन रोमँटिक संगीतमय सीरिज ‘बंदिश बँडिट्स’ची घोषणा केली आहे. ही सीरिज ४ ऑगस्‍ट २०२० पासून पाहायला मिळणार आहे. अमृतपाल सिंग बिंद्रा यांची निर्मिती आणि आनंद तिवारी यांचे दिग्‍दर्शन असलेली नवीन अमेझॉन ओरिजिनल सीरिज वेगवेगळ्या संगीत पार्श्‍वभूमींमधून असलेल्‍या दोन तरूण परफॉर्मर्सच्‍या प्रेमकथेला सादर करणार आहेत. दहा भागांच्‍या या सीरिजमध्‍ये रित्विक भौमिक हिंदुस्‍तानी शास्‍त्रीय कलाकार राधेच्‍या भूमिकेत आणि श्रेया चौधरी पॉपस्‍टार तमन्‍नाच्‍या भूमिकेत असून नसीरूद्दीन शाह, अतुल कुलकर्णी, कुणाल रॉय कपूर, शीबा चड्ढा आणि राजेश तेलंग यांसारखे दिग्‍गज कलाकार देखील यात असणार आहेत.  

‘बंदिश बँडिट्स’मध्‍ये दिग्‍गज संगीतकार त्रिकूट शंकर-एहसान-लॉय यांनी संगीतबद्ध केलेला उत्‍साहवर्धक ओरिजिनल साऊंडट्रॅक आहे. हे संगीतकार या सीरिजच्‍या माध्‍यमातून त्‍यांचे डिजिटल पदार्पण करत आहेत. ‘बंदिश बँडिट्स’ २०० देश व प्रदेशांमध्‍ये फक्‍त प्राइम व्हिडिओवर पाहता येणार आहे. 

“आम्‍हाला वैविध्‍यपूर्ण व सखोल प्रचलित कथा सादर करायला आवडते,” असे अॅमेझॉन प्राइम व्हिडिओमधील इंडिया ओरिजनल्‍सच्‍या प्रमुख अपर्णा पुरोहित म्‍हणाल्‍या. “बंदिश बँडिट्स ही विरूद्ध विश्‍व, परंपरा व संगीत घराण्‍यांच्‍या फ्यूजनमध्‍ये अडकलेल्‍या तरूण जोडप्‍याबाबतची संगीतमय रोमँटिक सीरिज आहे. प्राइम व्हिडिओवरील अशा प्रकारची ही पहिलीच शैली आहे. आम्‍हाला भारत व जगभरातील प्राइम सदस्‍यांसमोर ही सीरिज सादर करण्‍याचा आनंद होत आहे.”

 “बंदिश बँडिट्स ही अनेक गोष्‍टींमध्‍ये वेगवेगळ्या, पण अविश्‍वसनीयरित्‍या समान असलेल्‍या दोन व्‍यक्‍ती व संस्‍कृतींच्‍या मिलापाबाबतची कथा आहे,” असे ‘बंदिश बँडिट्स’चे दिग्‍दर्शक आनंद तिवारी म्‍हणाले. “प्रत्‍येक पात्र अद्वितीय असण्‍यासोबत कथादेखील लक्षेवधक आहे. या सर्व कथा एकत्र येऊन या सीरिजला प्रबळ, रोमँटिक व वास्‍तविक बनवतात. मी दिग्‍गज संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांच्‍या मधूर संगीतामधून सुरेखरित्‍या सांगण्‍यात आलेली रोमांसची ही अविश्‍वसनीय कथा प्राइम व्हिडिओवर सादर करण्‍यासाठी खूपच उत्‍सुक आहे.”