amazon film dhamaka

अमेझॉन प्राइम व्हिडिओने आधीच्या वर्ल्ड प्रिमिअर्सला(amazon prime world premier declaration)मिळालेल्‍या यशानंतर नुकतीच ९ बहुप्रतिक्षित चित्रपटांच्‍या नवीन यादीची घोषणा केली. या नवीन स्‍लेटमध्‍ये हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्‍नड व मल्‍याळम या ५ भारतीय भाषांमधील ९ टायटल्‍सचा समावेश आहे.(9 movies from 5 Indian languages on amazon)

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने आधीच्या वर्ल्ड प्रिमिअर्सला(amazon prime world premier declaration)मिळालेल्‍या यशानंतर नुकतीच ९ बहुप्रतिक्षित चित्रपटांच्‍या नवीन यादीची घोषणा केली. या नवीन स्‍लेटमध्‍ये हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्‍नड व मल्‍याळम या ५ भारतीय भाषांमधील ९ टायटल्‍सचा समावेश आहे.(9 movies from 5 Indian languages on amazon)

पाच भारतीय भाषांमधील हे नवे ९ चित्रपट असून यामध्ये वरूण धवन व सारा अली खान अभिनीत ‘कूली नं. १’, राजकुमार राव व नुशरत भरूचा अभिनीत ‘छलांग’, भूमी पेडणेकर अभिनीत ‘दुर्गावती’, अरविंद अय्यर अभिनीत ‘भीमसेना नल महाराजा’ (कन्‍नड), आनंद देवराकोंदा अभिनीत ‘मिडल क्‍लास मेलोडीज’ (तेलुगु) , आर. माधवन अभिनीत ‘मारा’ (तमिळ) आणि वर्षा बोल्‍लम्‍मा, चेतन गंधर्व अभिनीत ‘माने नंबर १३’ यासोबत नुकतेच घोषणा करण्‍यात आलेला झकारिया मोहम्मदचा ‘हलाल लव्‍ह स्‍टोरी’ (मल्‍याळम) आणि सुरिया अभिनीत ‘सूरराई पोट्रू (तमिळ) यांचा समावेश आहे.

कूली नं. १ (Coolie No. 1) (हिंदी), या चित्रपटाचा प्रिमिअर २५ डिसेंबर रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर सादर होणार आहे. छलांग (Chhalaang) (हिंदी), या चित्रपटाचा प्रिमिअर १३ नोव्‍हेंबर रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर सादर होणार आहे. दुर्गावती (Durgavati) (हिंदी), या चित्रपटाचा प्रिमिअर ११ डिसेंबर रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर सादर होणार आहे.  हलाल लव्‍ह स्‍टोरी (Halal Love Story) (मल्‍याळम), या चित्रपटाचा प्रिमिअर १५ ऑक्‍टोबर रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर सादर होणार आहे. ‘भीमसेन नल महाराजा'(bheemsen nal maharaja) (कन्‍नड), या चित्रपटाचा प्रिमिअर २९ ऑक्‍टोबर रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर सादर होणार आहे. सूरराई पोट्रू (SooraraiPottru) (तमिळ), या चित्रपटाचा प्रिमिअर ३० ऑक्‍टोबर रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर सादर होणार आहे.  माने नंबर १३(mane number 13) (कन्‍नड), या चित्रपटाचा प्रिमिअर १९ नोव्‍हेंबर रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर सादर होणार आहे. मिडल क्‍लास मेलोडीज(middle class melodies) (तेलुगु), या चित्रपटाचा प्रिमिअर २० नोव्‍हेंबर रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर सादर होणार आहे. मारा(mara) (तमिळ), या चित्रपटाचा प्रिमिअर १७ डिसेंबर रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर सादर होणार आहे.