देढफुट्या आणि रघुभाईची पहिली भेट, अमेय खोपकरांनी शेअर केली ‘वास्तव’ची आठवण!

१९९८ साली प्रदर्शित झालेल्या वास्तव चित्रपटात अभिनेता संजय दत्त मुख्य भूमिकेत होता तर अभिनेता संजच नार्वेकरने चित्रपटात देढफुट्याची भूमिका साकारली होती.

    सध्या सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोन सुपरस्टार अभिनेते आहेत. एक मराठीचित्रपटसृष्टीतला सुपरस्टार संजय नार्वेकर आणि दुसरा बॉलिवूडचा सुपरस्टार संजूभाई म्हणजे संजय दत्त. या दोघांचा वास्तव चित्रपटातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

    १९९८ साली प्रदर्शित झालेल्या वास्तव चित्रपटात अभिनेता संजय दत्त मुख्य भूमिकेत होता तर अभिनेता संजच नार्वेकरने चित्रपटात देढफुट्याची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या भूमिकेने संजय नार्वेकरला वेगळी ओळख दिली.

     

    अमेय खोपकर यांनी हा वास्तव चित्रपटातील दोन सुपस्टार संजय यांचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना ते लिहीतात, माझा जिवलग मित्र संजय नार्वेकरच्या आयुष्यातली अविस्मरणीय भूमिका ‘देढफुट्या’. ‘वास्तव’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोन संजय पहिल्यांदा आमने-सामने आले तो दुर्मिळ क्षण. १९९८ ला याच दिवशी झाली होती ही भेट.