पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अमेय वाघ करणार ‘दळण’ चा खास प्रयोग

पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘दळण’ या नाटकाच्या खास प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यात नाटक कंपनीच्या या नाटकाद्वारे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी गोळा केला जाणार आहे. त्यासाठी, नाटक कंपनीची संपुर्ण टीम आणि नाटकातले सर्व कलाकार पुढे सरसावले असून, पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर, येथे २८ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता ‘दळण’ चा खास प्रयोग सादर होणार आहेत. त्यामुळे, पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वाधिक संख्येने नाटक पाहावयास येण्याचे आवाहन त्यांनी प्रेक्षकांना केलं आहे. 

निपूण धर्माधिकारी दिग्दर्शित अभय महाजन व रोहित निकम लिखित या नाटकात अमेय वाघ, अलोक राजवाडे, ऋचा आपटे, अमृता भागवत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हे नाटक तरूणांमध्ये खूप लोकप्रिय आहे.