‘अलिबागकरांची माफी माग, नाहीतर कानाखाली आवाज काढीन’, अमेय खोपकरांचा आदित्यला इशारा!

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही आदित्यचा उद्धटपणा वाढलाय म्हणत कानाखाली आवाज काढला जाणार अशा शब्दात आदित्य नारायणला चांगलच खडसावले आहे.

    ‘इंडियन आयडल १२’  हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे शो रोज वादात अडकतो. इंडियन आयडलमध्ये होस्ट करणाऱ्या आदित्य नारायणने नुकत्याच पार पडलेल्या भागात शो सुरु असताना एका स्पर्धकाबरोबर बोलताना ”राग पट्टी ठिक से दिया करो, हम क्या अलिबागसे आये है क्या” ? असे म्हटले होतं. आदित्यच्या अशा बोलण्यावरुनच नवा निर्माण झाला आहे.

    अलिबाग विषयी असे बोलणे रसिकांनाही चांगलेच खटकले आणि आदित्यचे नॅशनल चॅनेवर असं बोलण्यावर रसिकही चांगलेच संतापले आहेत. तर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही आदित्यचा उद्धटपणा वाढलाय म्हणत कानाखाली आवाज काढला जाणार अशा शब्दात आदित्य नारायणला चांगलच खडसावले आहे.

    अमेय खोपकर म्हणतात…

    यांनी फेसबुकद्वारे त्यांचा संताप व्यक्त केला आहे. हिंदी चॅनेवर अनेकदा कलाकार अलिबागसे आये है क्या म्हणताना दिसतात. अशा लोकांना अलिबागची संस्कृती माहिती नाही? आमच्या अलिबागची लोकं माहिती नाहीय..? ”अलिबागकरांचा हा अपमान आहे. ही कोणती बोलायची पद्धत झाली. मनसे चित्रपट सेनेकडूनही या गोष्टीचा निषेध करतोय.

    आदित्य नारायण यांचे वडिल उदित नारायण यांनाही घडलेल्या प्रकाराविषयी माहिती दिली आणि त्यांच्याशी बोलणं झाल्याचे अमेय खोपकर यांनी म्हटलंय . तसेच सोनी चॅनेललाही आगामी भागात अलिबागच्या नागरिकांची माफी मागण्यास सांगितले आहे. यापुढे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. यापुढे असे काही अपमानास्पद ऐकायला मिळाले तर योग्य ती कारवाई केली जाणार असेही त्यांनी सांगितले आहे.