काही ही न करता असे कमवतो राज कुंद्रा पैसे, ‘द कपिल शर्मा शो’मधील ‘तो’ Video व्हायरल!

‘द कपिल शर्मा’ शोमधील कपिल शर्माने राजला त्याच्या उत्पन्नाबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

    अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अ‍ॅप्सवर प्रदर्शित करण्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज कुंद्राला ताब्यात घेतलंय. या प्रकरणी गुन्हे शाखेने राज कुंद्रासह ११ जणांना अटक केलीय.

    याचदरम्यान  ‘द कपिल शर्मा’ शोमधील कपिल शर्माने राजला त्याच्या उत्पन्नाबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रा आणि बहीण शमितासोबत हजेरी लावली होती. यात कपिल शर्मा राज कुंद्राला म्हणतो, “तुम्ही कधी सेलिब्रिटींसोबत फूटबॉल मॅच खेळताना दिसता, कधी फ्लाईटमध्ये, कधी शिल्पासोबत शॉपिंग करताना दिसतात. पण जरा आम्हाला देखील सांगा काही न करता तुम्ही पैसै कसे कमवता.” कपीलच्या या प्रश्नानंतर शोमध्ये एकच हशा पिकला होता.

    यावेळी स्वत: राज कुंद्रा आण शिल्पा शेट्टीला देखील हसू आवरणं कठिण झाल्याचं दिसतंय. तर कपिलच्या या प्रश्नावर मात्र शिल्पाने नंतर पतीची बाजू सावरत राज कुंद्रा खूप मेहनत घेत असल्याचं म्हणाली होती. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.