‘बिग बी’ यांचा आज ७८ वा वाढदिवस, सेलिब्रेशन न करण्याचा घेतला मोठा निर्णय, काय आहे कारण?

हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक आणि शहेनशहा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आज ७८ वा वाढदिवस (Birthday ) आहे. या दिवशी चाहत्यांसाठी एक आनंदाचा दिवस असतो. त्यांचे हजारो चाहते वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांची एक झलक पाहण्यासाठी जुहूतील प्रतीक्षा बंगल्याबाहेर गर्दी करतात. परंतु कोरोनाच्या सावटात (Corona Virus) बिग बी (BIG BI) यांनी वाढदिवस सेलिब्रेशन न करण्याचा निर्णय घेतला आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक आणि शहेनशहा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आज ७८ वा वाढदिवस (Birthday ) आहे. या दिवशी चाहत्यांसाठी एक आनंदाचा दिवस असतो. त्यांचे हजारो चाहते वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांची एक झलक पाहण्यासाठी जुहूतील प्रतीक्षा बंगल्याबाहेर गर्दी करतात. परंतु कोरोनाच्या सावटात (Corona Virus) बिग बी (BIG BI) यांनी वाढदिवस सेलिब्रेशन न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आज रविवार (Sunday) आणि मुख्य म्हणजे जन्मदिवस असताना सुद्धा अमिताभ बच्चन केबीसी १२ (KBC 12) च्या शूटिंगमध्ये व्यस्त असणार आहेत.

बच्चन कुटूंबीयांनी सांगितले की, ‘महामारीच्या काळात पार्टीचे प्लॅनिंग (Planning) कोण करतं? यावर्षी त्यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करू. अमिताभजी हे सध्या केबीसी १२ चे शूटिंग करत आहेत. वाढदिवशीही ते कामातच व्यस्त असतील.’ दरम्यान अमिताभ बच्चन यांनी शनिवारी सोशल मिडियावर केबीसीच्या सेटवरील रेकॉर्डिंग दरम्यानचा एक फोटो शेयर केला आहे. ऍट वर्क…केबीसी सकाळी ९ ते रात्री ९. मेहनतीशिवाय आयुष्यात काहीच मिळत नाही. बाबूजी म्हणायचे, जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत संघर्ष आहे.’ अशी पोस्ट त्यांनी केली आहे. अमिताभ बच्चन यांचा आज ११ ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे.

अमिताभ यांनी चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत १८० हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या. अमिताभ हे भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक आहेत.