amitabh bachchan

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची गाड्यांची आवड सगळ्यांनाच माहितेय. त्यांच्याकडे असणाऱ्या गाड्यांच्या ताफ्यात आणखी एका आलिशान नव्या कारची भर पडली आहे. अमिताभ यांनी टोयोटा इनोव्हा क्रिस्टा ही नवी गाडी खरेदी केलीये. नुकतीच त्यांच्या गाडीची डिलिव्हरी मिळाली आहे. अमिताभ यांच्या ताफ्यात मर्सिडीज बेन्झ आहेच. आता या नव्या आलिशान गाडीची भर पडली आहे. टोयोटाने गेल्या महिन्यात इनोव्हा क्रिस्टाचं आधुनिक व्हर्जन लाँच केले होते. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी स्वतःसाठी इनोव्हा क्रिस्टा खरेदी केली.

View this post on Instagram

A post shared by Drive (@driveindia1)

अमिताभ बच्चन यांच्याकडे अनेक आकर्षक गाड्या आहेत. त्यांनी अनेक कंपन्यांच्या वेगवेगळ्या गाड्या विकत घेतल्या आणि चालवल्याही. काहींनी त्यांना गाड्या भेटही दिल्या असतील. याबाबत Instagram वर एक फोटो शेअर करण्यात आला असून त्यात अमिताभ बच्चन मुंबईतील घरी या नवीन गाडीची डिलिव्हरी स्वीकारताना दिसत आहेत.

टोयोटा इनोव्हा क्रिस्टा 2016 मध्ये लाँच करण्यात आली होती. त्यानंतर प्रथमच कंपनीने मॉडेल अपडेट केलं आहे. या मॉडेलमध्ये ग्रील्समध्ये बदल करण्यात आले असून फ्रंट डिझाइन अधिक आकर्षक करण्यात आलं आहे. या एमपीव्हीचे हेडलाईटस आता एलईडीचे असतील. सात पूरक एअरबॅग, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स आणि ब्रेक असिस्ट अशी नवी वैशिष्ट्यं या मॉडेलमध्ये आहेत. इनोव्हा क्रिस्टाच्या या नव्या मॉडेलची किंमत 16.26 लाख आहे. तर एमपीव्हीच्या टॉप मॉडेलची किंमत 24.33 लाख रुपये आहे.

ही आहेत कारची वैशिष्ठ्य

या कारमध्ये २.४ लिटर डिझेल इंजिनचा पर्याय आहे. पेट्रोल व्हेरिएंटमधील मॉडेल्समध्ये २.७ लिटर इंजिनचा पर्याय आहे. आहे. नवीन इनोव्हा क्रिस्टामध्ये डॅशबोर्डवर अॅड्रॉईड ऑटो आणि अॅपल कारप्ले सपोर्टसह 8 इंचाचा टच स्क्रिन डिस्प्ले देण्यात आला आहे. यात प्रगत कनेक्टिव्हीटी सिस्टम देखील देण्यात आली आहे.