amitabh bachchan

आजपर्यंत जे काही बघितलं नव्हतं. ते एका वर्षाने संपूर्ण जगाला दाखवलं. या कोरोनाकाळात या जगाने अनेक दिग्गजांचे मृत्यू बघितले. अनेकजण मृत्यूच्या दारातून परत आली आहेत. कोरोनाने सगळ्यांचीच सत्वपरिक्षा घेतली. कोरोनामुळे ठप्प झालेला देश, त्यामुळे बंद झालेला रोजगार, मध्येच अवकाळी पावसाचं संकट हे सगळं एका वर्षात अनुभवलं. या वर्षाने एकदी गरीबापासून ते थोरामोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच निराशा केली. अनेक दिग्गज कलाकरांना या कोरोनाने आपल्यापासून हिरावून घेतलं.

त्यामुळे येणारं नवीन वर्ष सुख आमि समृद्धीचं असावं. २०२१ या वर्षात कोरोना हद्दपार व्हावा. येणाऱ्या वर्षाला कुणाची दृष्ट लागू नये असा विचार आज प्रत्येकाच्या मनात आहे. पण आपण फक्त विचारच करतोय तोपर्यंत येणाऱ्या नव्या वर्षाची महानायकांनी दृष्ट काढली सुध्दा.

View this post on Instagram

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

२०२१ या वर्षावरचे अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका मीम्सने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं. हे मीम्स आहे अमिताभ बच्चन यांच. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हे मीम्स शेअर केलं आहे. या मीम्समध्ये २०२१ असं लिहीलेला एक फोटो आहे. त्यात लिंबू आणि मिरची लटकलेली दिसत आहे. कृपा.. कृपा…कृपा असं कॅप्शन या फोटोला दिलं आहे.