बिग बी चाहत्यांवर नाराज, जून्या छोट्या फॅन्सचा फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना!

बिग बी यांनी शेयर केलेल्या फोटोमध्ये ते एका छोटय़ा चाहतीला ऑटोग्राफ देताना दिसत आहेत. त्यांच्या बाजूला अभिनेते शशी कपूर दिसत आहेत.

  महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यातील अनुभव ते आपल्या चाहत्यांसोबत शेयर करत असतात. नुकताच त्यांनी एक थ्रोबॅक फोटो शेयर करत चाहत्यांमध्ये कशा प्रकारे बदल झाला याबाबत सांगितले आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

  बिग बी यांनी शेयर केलेल्या फोटोमध्ये ते एका छोटय़ा चाहतीला ऑटोग्राफ देताना दिसत आहेत. त्यांच्या बाजूला अभिनेते शशी कपूर दिसत आहेत. हा फोटो शेअर करत त्यांनी म्हटलंय, ‘‘आता ते दिवस गेले जेव्हा चाहते मला अशा प्रकारे प्रेम आणि आदर करायचे. या मुलीकडे बघा. आभारी असल्याचे व्यक्त करत आहे. तिच्या चेहऱयावर असणारे हावभाव बघा. आता फक्त इमोजी शिल्लक राहिले आहेत. जर तुम्ही भाग्यवान असाल तर!’’ त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांपासून सेलिब्रिटी कमेंट करत त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.