amitabh bachchan on mask on corona virus situation

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. ते कायमच ट्विट, फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या ट्विटमुळे ते कायम चर्चेत येतात. यावेळी अमिताभ चक्क गुलाबजाम आणि रसगुल्ला या गोड पदार्थांमुळे चर्चेत आहेत. बिग बींनी इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांच्या एका हातात गुलाबजाम दिसतोय तर दुसऱ्या हातात रसगुल्ला.

View this post on Instagram

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

हा फोटो पोस्ट करत अमिताभ बच्चन यांनी लिहिलेलं कॅप्शन सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहेत. “जेव्हा गोड पदार्थ खाणं थांबवलं तेव्हा या शूटिंगवाल्यांनी माझ्या हातात गुलाबजाम आणि रसगुल्ला दिला. अन् म्हणतायेत या पदार्थांची चव सांगणारं एक्सप्रेशन द्या. आयुष्यात यापेक्षा मोठा टॉर्चर होऊच शकत नाही.” अशा आशयाची कॅप्शन देत अमिताभ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

View this post on Instagram

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

यापूर्वीही अनेकदा चर्चेत

यापूर्वी बिग बी कानांच्या कवितेमुळे चर्चेत होते. या कवितेद्वारे त्यांनी आपल्या कानांचं मनोगत सांगण्याचा प्रयत्न केला होता. कान जर खरंच बोलू लागले तर ते काय बोलतील? स्वत:च्या समस्या कशा सांगतील? हे त्यांनी या कवितेद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला. “मैं हूँ कान… हम दो हैं… जुड़वां भाई…, लेकिन हमारी किस्मत ही ऐसी है, कि आज तक हमने अपने दूसरे, भाई को देखा तक नहीं” अशी कविता त्यांनी पोस्ट केली होती. तर २०२१ या वर्षाची दृष्ट काढलेला फोटोही चांगलाच व्हायरल झाला होता.