जगभरातील नामांकित कलाकारांना मागे टाकत महानायकांनी पटकावला ‘हा’ मानाचा पुरस्कार!

सर्वोत्कृष्ट अभिनेता या गटात त्यांच्यासोबतच टॉम हँक्स, ब्रॅडली कूपर, लिओर्नादो डिक्रॅप्रिओ, मॅट डेमन यांसारखे नामांकित कलाकार होते. परंतु यांच्यावर मात करत बिग बींनी FIAF पुरस्कारावर आपलं नाव कोरलं.

  महानायक अमिताभ बच्चन हे जगातील सर्वोत्कृष्ठ अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या याच कौशल्याचं कौतुक आता ‘इंटरनेशनल फेडरेशन ऑफ फिल्म आर्काइव्स’ करणार आहे. बिग बीं अमिताभ बच्चन यांना FIAFद्वारे सन्मानित केलं जाणार आहे. FIAF हा सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित असा पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार पटकावणारे ते भारतातील पहिले अभिनेता ठरले आहेत. येत्या १९ मार्चला हा पुरस्कार त्यांना प्रदान करणार आहेत.

  View this post on Instagram

  A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

  FIAF पुरस्काराचा यंदाचा २०वा वर्ष आहे. FIAFचे अध्यक्ष फेडरिक मेरे यांनी सांगितलं की यंदा या सोहळ्यामध्ये वर्षभरात गाजलेल्या शॉर्ट फिल्म आणि कलाकारांच्या मुलाखती देखील दाखवल्या जाणार आहेत. दरवर्षी हा पुरस्कार सोहळा अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे साजरा केला जातो. मात्र यंदा करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे तो ऑनलाईन पार पाडला जाणार आहे.