‘महिला क्रिकेट संघ तयार होतोय, त्यात धोनीची मुलगी कॅप्टन असेल’ बिग बींनी विराट कोहलीला दिल्या अनोख्या शुभेच्छा!

अमिताभ यांनी एक फोटो पोस्ट केला. या फोटोत भारतीय संघातील विविध क्रिकेटपटूंची नावं आहेत ज्यांना कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. ही यादी धोनी, रैना यांच्यापासून सुरू झाली. यात रोहित, शमी, अश्विन, अजिंक्य रहाणे या साऱ्यांचीही नावं आहेत. या यादीतच्या शेवटी विराटचं नाव जोडण्यात आलं आहे. आणि, भारताचा भविष्यातील महिला क्रिकेट संघ तयार होत असल्याचं लिहिलं आहे

क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. विराटने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. ‘कळवण्यास खूप आनंद होत आहे की आम्हाला कन्यारत्न प्राप्ती झाली’, अशा आशयाचा संदेश त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला. त्यांनंतर विराट- अनुष्कावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. बिग बी अमिताभ बच्चन यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. पण जरा हटके.

काय आहे पोस्ट

अमिताभ यांनी एक फोटो पोस्ट केला. या फोटोत भारतीय संघातील विविध क्रिकेटपटूंची नावं आहेत ज्यांना कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. ही यादी धोनी, रैना यांच्यापासून सुरू झाली. यात रोहित, शमी, अश्विन, अजिंक्य रहाणे या साऱ्यांचीही नावं आहेत. या यादीतच्या शेवटी विराटचं नाव जोडण्यात आलं आहे. आणि, भारताचा भविष्यातील महिला क्रिकेट संघ तयार होत असल्याचं लिहिलं आहे. यांनी फोटोसोबत कॅप्शन देताना धोनीची मुलगी या संघाची कर्णधार असेल का? असा मजेशीर सवाल केला आहे.