‘मी आता थकलो आहे आणि रिटायर झालो आहे…’,अखेर अमिताभ बच्चन यांनी केली रिटायरमेंटची घोषणा,

अमिताभ यांच्या या ब्लॉग नंतर चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न पडले आहेत. अमिताभ बच्चन शो सोडणार का? कि कौन बनेगा करोडपती बंद होणार असे असंख्य प्रश्न चाहत्यांना सतावत आहेत.

लोकप्रिय कार्यक्रम कौन बनेगा करोडपती हा कायम चर्चेत तर असतोच पण सर्वाधिक बघितला जाणाऱ्या कार्यक्रमांमधील एक कार्यक्रम आहे. बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतात. सध्या केबीसी १२ प्रेक्षकांच्या चांगलच गाजत आहे. पण आता अमिताभ यांनी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये रिटारमेंटचा उल्लेख केल्यामुळे ते केबीसीमधून रिटायर होत असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून अनेक गोष्टी सर्वांसमोर आणत असतात. नुकताच लिहिलेल्या ब्लॉगमध्ये त्यांनी रिटायरमेंटची घोषणा केली आहे. ‘मी आता थकलो आहे आणि रिटायर झालो आहे… मी सर्वांची माफी मागतो… कौन बनेगा करोडपतीच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण खूपच लांबले… कदाचित उद्या पुन्हा चांगले करु शकेन पण लक्षात ठेवा काम हे काम असते आणि ते पूर्ण मन लावून करायला हवे’ असे त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिलय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

त्याचप्रमाणे पुढे ब्लॉगमध्ये म्हटलय,  ‘शुटींगच्या शेवटच्या दिवशी खूप सारं प्रेम मिळालं… पण शेवटी सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात. इच्छा तर कुठेही न थांबण्याची आहे पण थांबावे लागेल.. मी आशा करतो की हे सगळं पुन्हा होईल. सेटवरील क्रू आणि टीममेंबर्स खूप मेहनती आहेत. या आशा गोष्टी आहेत ज्या सेटवर काम करण्यास तुम्हाला प्रोत्साहन देतात. सेटवर सगळ्यांनी माझी काळजी घेतली आहे. गेले अनेक दिवस आपण एकत्र काम करत आहोत.. ते क्षण माझ्या कायम आठवणीमध्ये राहतील. तुम्हा सर्वांचे आभार.’

अमिताभ यांच्या या ब्लॉग नंतर चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न पडले आहेत. अमिताभ बच्चन शो सोडणार का? कि कौन बनेगा करोडपती बंद होणार असे असंख्य प्रश्न चाहत्यांना सतावत आहेत.