अमितभा बच्चन यांच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या हेड कॉन्स्टेबलचा दीड कोटी पगार ऐकताच राज्य सरकार करणार चौकशी!

जितेंद्र यांचा वार्षिक पगार हा दीड कोटी असल्याचं समजताच मुबंईचे पोलीस आय़ुक्त हेमंत नगराळे यांनी जितेंद्र यांची बदली ही डीबी मार्ग पोलिस ठाण्यात करण्यात आलीये.

  बिग बी अमिताभ बच्चन यांची एक झलक बघण्यासाठी चाहते गर्दी करतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर सुरक्षतीतेचा प्रश्न निर्माण होतो. अमिताभ यांचे अंगरक्षक म्हणून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुंबई पोलिसातील हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे यांची आहे. गेले दोन दिवस त्यांच्या वार्षिक पगाराची चर्चा सुरू आहे. जितेंद्र यांचा वार्षिक पगार हा दीड कोटी असल्याचं समजताच मुबंईचे पोलीस आय़ुक्त हेमंत नगराळे यांनी जितेंद्र यांची बदली ही डीबी मार्ग पोलिस ठाण्यात करण्यात आलीये.

  काय घडलं पुढे

  एका आयपीएस अधिकाऱ्यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला. हेमंत नगराळे यांनी ठरवलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार पद्धतीत बदल आहेत. कोणताही पोलिस कॉन्स्टेबल एका ठिकाणी ५ वर्ष राहू शकत नाही. त्यामुळे जिंतेंद्र यांनी बदल करण्यात आली आहे असं ते म्हणाले.

  पोलीस कर्मचाऱ्यांना सरकारी पगार मिळत असताना अशा पद्धतीने पैसे घेण्याची परवानगी नाही. राज्य सेवा नियमांच्या हे विरोधात आहे. आता राज्य सरकार याची चौकशी करत होते. जितेंद्र त्यांच्या वार्षिक उत्पन्नाबद्दल आणि त्यांच्या मालमत्तेबद्दस पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली होती का? आणि ते दुसऱ्या व्यक्तीकडून पगार घेत होते का?

  जितेंद्र यांचा आणखी एक व्यवसाय

  जितेंद्र यांच्या पत्नीचा मोठा व्यवसाय आहे. त्याची स्वत:ची सेक्यूरिटी एजन्सी आहे. त्या मार्फत ते सेलिब्रेटींना सुरक्षेसाठी बॉडिगार्ड आणि सुरक्षा पुरवतात. जितेंद्र यांना राज्य सरकार नोटीस देणार आहेत आणि माहिती घेणार आहेत.