बिग बींच्या आवाजातील ‘ती’ कोरोना कॉलर ट्यून बंद होणार, त्या जागी सुरू होणार ‘ही’ नवी ट्यून!

आत्तापर्यंत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यांना प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून प्रत्येक मोबाईल वापरकर्त्याला ऐकू येत होती. मात्र, ही कॉलर ट्यून लवकरात लवकर हटवण्यात यावी, यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

महानायक अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कोरोना प्रतिबंधाची माहिती देणारी कॉलर ट्यून बंद करण्यात येणार आहे. या कॉलर ट्यून ऐवजी कोरोना लसीकरमाची धून ऐकू येणार आहे. देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार असल्याने, याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी ही ट्यून बदलण्यात येणार आहे.

आत्तापर्यंत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यांना प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून प्रत्येक मोबाईल वापरकर्त्याला ऐकू येत होती. मात्र, ही कॉलर ट्यून लवकरात लवकर हटवण्यात यावी, यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

शुक्रवारपासून कोरोना कॉलर ट्यून हटवून त्या ऐवजी लसीकरणाची नवी ट्यून लावण्यात येणार आहे. हा नवा संदेश तयार करण्याचे काम सरकारच्या वतीने सुरु करण्यात आले आहे. स्वास्थ मंत्रालय आणि सूचना प्रसारण मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या दरम्यान, सोमवारी या संदर्भातील बैठक पार पडली आहे. या नव्या कॉलर ट्यूनला अमिताभ बच्चन यांचा आवाज असणार की आणखी कोणाचा हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, ही कॉलर ट्यून देखील अमिताभ बच्चन यांच्या आवाजात रेकॉर्ड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे