शून्य तापमानात अमिताभ बच्चन यांनी केलं ‘चेहरे’चं शुटींग शेअर केला खास अनुभव!

शून्य तापमानातही अमिताभ सर्वात आधी सेटवर हजर असायचे. त्यांची कामाप्रती कमिटमेंट आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत होती.

    काही कलाकार आपल्या वाट्याला आलेल्या कोणत्याही व्यक्तिरेखेत जीव ओतण्यासाठी वाट्टेल ते कष्ट घ्यायला तयार असतात. अमिताभ बच्चन म्हणजेच एबी हे याचं सर्वात मोठं उदाहरण आहेत. वयाच्या या टप्प्यावर लोकं जिथं आरामात जीवन जगतात तिथं एबी आजही कठीणातील कठीण भूमिका यशस्वीपणे साकारण्यासाठी धडपडत असतात. लॅाकडाऊनमुळं मागील काही दिवसांपासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेल्या ‘चेहरे’ या चित्रपटाशी निगडीत असलेली अमिताभ यांचा एक किस्सा निर्माते आनंद पंडीत यांनी रिव्हील केला आहे.

    ‘चेहरे’साठी अमिताभ यांनी शून्य तापमानामध्ये शॅाकिंग अॅक्शन सिक्वेन्स केल्याचं पंडीत यांनी सांगितलं आहे. या चित्रपटातील अॅक्शन सिक्वेन्सेस युरोपमध्ये शूट करण्यात आले आहेत. शून्य तापमानातही अमिताभ सर्वात आधी सेटवर हजर असायचे. त्यांची कामाप्रती कमिटमेंट आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत होती. त्यांच्यासह संपूर्ण टीमनं कठीण परिस्थितही कठोर मेहनत घेतल्यानं ‘चेहरे’चं शूटिंग ठरलेल्या वेळेत पूर्ण होऊ शकल्याचं पंडीत यांचं म्हणणं आहे.

    अमिताभ यांना नेहमीच नवनवीन आव्हानं स्वीकारायला आवडतात. ‘चेहरे’ या मिस्ट्री थिलर चित्रपटातही प्रेक्षकांना त्यांची नेहमीप्रमाणेच काहीशी वेगळी भूमिका पहायला मिळेल.