अमृता वहिनींच नवं गाणं चाहत्यांच्या भेटीला, तुम्हाला आवडलं का हा Video?

गणेशोत्सवापूर्वी अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याचा व्हिडीओ प्रदर्शित होणार होता. त्यानुसार आज त्यांचं गणेश वंदनेचा व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे.

    विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे आणि गाण्यांमुळे चर्चेत असतात. त्या सोशल मीडियावरही सक्रीय आहेत. त्यांच्या गाण्यांमुळे अमृता फडणवीसांची नेहमीच चर्चा होते. नुकतच अमृता फडणवीस यांच आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. गणेशोत्सवापूर्वी अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याचा व्हिडीओ प्रदर्शित होणार होता. त्यानुसार आज त्यांचं गणेश वंदनेचा व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे.

    ३ सप्टेंबरला अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याचा व्हिडिओ लाँच करण्यात आलाय. गणेश वंदना  या नावाने हा व्हिडीओ आहे. अमृता फडणवीस यांच्या गाण्याप्रमाणेच त्यांच्या लूकची चर्चाही रंगते. या गाण्यामध्ये त्या पारंपरिक मराठमोळ्या रुपात दिसत आहेत. गणेश पूजेचं हे गाणं असणार आहे. यामध्ये एका डॉक्टरच्या भूमिकेत अमृता फडणवीस दिसत आहेत. ‘भक्तीचे दुसरे नाव सेवा’ असं म्हणत डॉक्टरांच्या सेवेची जाण ठेवणारा हा व्हिडीओ आहे.अमृता फडवणीस यांची आधी प्रदर्शित झालेली गाणी व्हायरल झाली होती. त्यामुळे आता या गाण्याला देखील कसा प्रतिसाद मिळतो आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.