मुलाच्या जन्मानंतर आई अमृता राव पुन्हा लागली कामाला, पहिली जाहिरात केली शूट!

मुलाचं संगोपन आणि करियर असा ताळमेळ साधत अमृता पुढे वाटचाल सुरू ठेवणार आहे. याची जणू रंगीत तालीमच अमृतानं जाहिरात शूटिंगच्या माध्यमातून केल्याचं जाणवतं.

    गोड चेहऱ्याची अभिनेत्री अमृता राव पुन्हा एकदा फिल्डवर परतली आहे. प्रेग्नंसीनंतर अमृतानं पुन्हा एकदा नव्या जोमानं कामाला सुरुवात केली आहे. मागच्या वर्षी अमृतानं गोड मुलाला जन्म दिला. तेव्हापासून ती त्याच विश्वात रमली होती. आता मुलगा मोठा होत असल्यानं अमृतानं पुन्हा काम सुरू केलं आहे.

    मुलाचं संगोपन आणि करियर असा ताळमेळ साधत अमृता पुढे वाटचाल सुरू ठेवणार आहे. याची जणू रंगीत तालीमच अमृतानं जाहिरात शूटिंगच्या माध्यमातून केल्याचं जाणवतं. नुकतीच अमृतानं एक अॅड शूट केली, पण हा अनुभव तिच्यासाठी काहीसा वेगळा होता. पीपीई किट परिधान केलेल्या युनीटसोबत अमृतानं अॅडचं शूटिंग पूर्ण केलं. कोरोना विषयीचे सर्व नियम आणि निर्बंधांचं पालन करत मर्यादित क्रूच्या उपस्थितीत अॅड शूट करण्यात आली. यावेळी कोरोना चाचणी केलेले केवळ पाच क्रू उपस्थित होते अशी माहिती मिळाली आहे.

    याबाबत अमृता म्हणाली की, माझ्या जन्मानंतर माझ्या आईनं आपलं करियर सोडलं नव्हतं. तिनं सर्व काही बॅलन्स केलं. आज तिच्याच पावलावर पाऊल टाकत पुन्हा कामावर रुजू झाल्याचं अमृता म्हणाली.