मॉर्निंग वॉकला गेलेल्या मलायकाला आजोबांनी भररस्त्यात थांबवलं, VIDEO होतोय व्हायरल!

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर वूमप्लाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मलायका तिच्या पाळीव कुत्र्याला सकाळी फिरायला घेऊन जात असताना दरम्यान, एक वृद्धी व्यक्ती मलायकाला थांबवतात आणि तिची स्तृती करु लागतात.

  अभिनेत्री मलायका अरोरा ही चित्रपटात दिसत नसली तरी ती नेहमी चर्चेत असते. तीचा फिटनेस, तिचे फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत येते. मलायका सध्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय डान्स शो ‘सुपर डान्सर ४’ ची परिक्षक आहे. शिल्पा शेट्टीच्या कुटुंबाला कोरोना झाल्यानंतर मलायका शिल्पाच्या जागेवर आली आहे. दरम्यान, मलायका पुन्हा एकदा एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Voompla (@voompla)

  बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर वूमप्लाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मलायका तिच्या पाळीव कुत्र्याला सकाळी फिरायला घेऊन जात असताना दरम्यान, एक वृद्धी व्यक्ती मलायकाला थांबवतात आणि तिची स्तृती करु लागतात. “आम्ही तुझा डान्स शो पाहतो. आम्हाला तुझा डान्स शो खूप आवडतो. कोरोनाच्या काळात देखील त्यावर कोणता परिणाम होतं नाही आहे. ही एक उत्तम गोष्ट आहे. माझ्या शुभेच्छा तुझ्यासोबत आहेत. ईश्वर नेहमीच तुझ्यासोबत आहे,”असे ते म्हणतात. त्यानंतर मलायका विनम्र पणे त्यांचे आभार मानते आणि त्यांचा निरोप घेते.

  अजोबा झाले ट्रोल

  मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘ती वृद्ध व्यक्ती मलायकावर लाइन मारत आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘काका तुम्ही जे इशारे करत आहात ते काही बरोबर वाटतं नाही.’