‘तू तर ‘फ्लॅटस्क्रीन’ अशा कमेंट यायच्या आधी ‘या’ अभिनेत्रीच्या फोटोंवर, त्यामुळे काही दिवस गेली होती नैराश्यात!

अनन्या ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी आहे. स्टुडंट ऑफ द ईयर २  या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिनं पती पत्नी और वो, अंग्रेजी मिडियम, खाली पिली या चित्रपटांमध्ये काम केलं.

  बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आपल्या विचित्र विधानांमुळे नेहमी चर्चेत असते. पण अनन्याला बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यावर नाही तर चित्रपटात काम करण्या आधी पासून अनेकदा ट्रोल केलं जायचं. यातील एक अनुभव अनन्याने स्वत:च एका मुलाखतीत सांगितला. अनन्याला सगळे प्लॅटस्क्रीन म्हणून चिडवायचे.

  View this post on Instagram

  A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

  एका मुलाखतीत अनन्यानं बॉडी शेमिंगचा अनुभव सांगितला. “चित्रपटात पदार्पण करण्यापूर्वी मी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. कुटुंबीयांसोबत मी पिकनिकला गेले होते त्यावेळचे ते फोटो होते. मात्र फोटो पाहून नेटकऱ्यांनी माझी खिल्ली उडवली. मी मुलांसारखी दिसते. तू तर फ्लॅटस्क्रीन आहेस अशा कॉमेंट केल्या होत्या. अशा प्रकारच्या कॉमेंटमुळं मी नैराश्येत देखील गेले होते. स्वत:वरचा विश्वास हळूहळू कमी झाला होता. पण पालकांमुळे मी या परिस्थितीतून बाहेर आले. आता माझ्यावर या ट्रोलिंगचा काहीही परिणाम होत नाही.” असा अनुभव या मुलाखतीत अनन्यानं सांगितला.