anil kapoor and anurag kashyap

अनिल कपूर आणि अनुराग कश्यप यांच्यात सध्या शाब्दिक युद्ध सुरू आहे. ट्विटरवर हे युद्ध सुरु आहे. आधी मजा म्हणून दोघांच्या संभाषणाला सुरुवात झाली. पण कालांतराने प्रकरणं तापलं. दोघांनी एकमेकांवर टीका करायला सुरुवात केली.

अनिल कपूर(anil kapoor ) आणि अनुराग कश्यप(anurag kashyap) यांच्यात सध्या शाब्दिक युद्ध सुरू आहे. ट्विटरवर हे युद्ध सुरु आहे. आधी मजा म्हणून दोघांच्या संभाषणाला सुरुवात झाली. पण कालांतराने प्रकरणं तापलं. दोघांनी एकमेकांवर टीका करायला सुरुवात केली.

अनिल कपूर यांनी ट्विटरवर दिल्ली क्राइम या वेब सीरिजच्या टीमचं कौतुक केलं. ‘तुम्हा लोकांचा हक्क आहे.. चांगलं वाटतं जेव्हा  लोकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळत आहे.’ अनिल कपूर यांच्या या ट्वीटला उत्तर देताना अनुरागने लिहिलं की, ‘अनुराग कश्यप यांनी लिहिले की, ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर काही चांगल्या लोकांना मान्यता मिळत आहे हे वाचून छान वाटलं. तसं तुमचा ऑस्कर कुठे आहे?’

अनुरागच्या या ट्वीटला उत्तर देताना अनिल कपूरने लिहिले की, ‘तू ऑस्करच्या जास्तीत जास्त तेवढाच जवळ गेलेलास जेव्हा तू टीव्हीवर स्लमडॉग मिलेनिअरला ऑस्कर जिंकताना पाहिलं.’

अनुराग कश्यपने पुढे लिहिले की, ‘स्लमडॉग मिलेनिअरमध्ये शाहरुख पहिली पसंती होती. तुम्ही या सिनेमासाठी दुसरी निवड होता ना?’

अनिल कपूर यांनी लिहिले की, ‘कुणीतरी काम सोडलं आणि मी ते काम पकडलं. मला त्याची पर्वा नाही. काम म्हणजे काम. तुझ्याप्रमाणे मला कामाच्या शोधासाठी स्वतःचे केस तर ओढावे लागत नाहीत.’

यावर अनुरागने लिहिले की, ‘सर, केसांबद्दल तर तुम्ही बोलूच नका. तुम्ही केसांच्या जोरावर तर सिनेमांत भूमिका मिळवल्या.’