jug jug jio team

राज यांनी यापूर्वी 'गुड न्यूज' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'जुग जुग जिओ' हा लाइटहार्टेड ड्रामा असल्याचं सांगितलं जातं आहे.

    चित्रपटांमधील पार्टी साँग्ज नेहमीच तरुणाईच्या आकर्षणाचं केंद्र ठरत आली आहेत. आता या पार्टी साँगच्या तालावर एव्हरग्रीन अभिनेता अनिल कपूर आणि युथचा लाडका वरुण धवन यांची पावलं थिरकणार आहेत. ‘जुग जुग जिओ’ या आगामी चित्रपटात अनिल-वरुण यांचा पार्टी डान्स पहायला मिळणार आहे. लॅाकडाऊननंतर बऱ्याच डान्सर्सना या गाण्याच्या निमित्तानं परफॅार्म करण्याची संधी मिळाली आहे.

    गोरेगावमधील रॅायल पाल्म्समध्ये डझनभर आर्टिस्टच्या उपस्थितीत हे गाणं शूट करण्यात आलं आहे. आदिल शेखनं कोरिओग्राफ केलेल्या या गाण्यात अनिल आणि वरुण भलतेच चार्ज झाल्याचं पहायला मिळेल. ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटानंतर या गाण्यात आदिल पुन्हा एकदा वरुणला आपल्या ताालावर नाचवलं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता आहेत. राज यांनी यापूर्वी ‘गुड न्यूज’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘जुग जुग जिओ’ हा लाइटहार्टेड ड्रामा असल्याचं सांगितलं जातं आहे.

    मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली होती, पण नीतू कपूर आणि वरुणसोबतच टीममधील बरेच कलाकार-तंत्रज्ञ कोरोना पॅाझिटीव्ह झाल्यानं शूट थांबवण्यात आलं होतं.