अखेर दीपिका पदुकोणने तिच्या सर्वात जवळच्या व्यक्तींची नावं केली जाहीर, फोटो शेअर करत दिलं चाहत्यांना उत्तर!

दीपिकानं इन्स्टाग्राम स्टोरीत तिचे दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये अनीशा आणि दीपिका एकमेकांना मिठी मारत आहेत. तर दुसरा फोटो दीपिका आणि रणवीरचा आहे. ज्यामध्ये दीपिका रणवीरच्या गालावर किस करत आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोण आपल्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त मानधन घेण्याचा बहुमान नुकताच तिने मिळवला आहे. बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त मानधन घेण्याचा बहुमान नुकताच तिने मिळवला आहे. तिच्याविषयी जाणून घ्यायला प्रत्येक चाहत्याला आवडतं. दीपिकाही चाहत्यांना नाराज करत नाही. चाहत्यांच्या प्रश्नाला ती उत्तर देते. तिचे सर्वात जवळचे व्यक्ती कोण आहेत. अनेकदा तिला हा प्रश्न प्रेक्षकांकडून विचारला जातो. पण आता दीपिकानं या प्रश्नाचं उत्तर स्वतःहून दिलं आहे.

दीपिका पादुकोणने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने फोटोच कोलाज बनवलं आहे. आपल्या चाहत्यांच्या विनंतीवरून तिने हे फोटोज शेअर केली आहेत. या फोटोत अनीशा आणि रणवीर आहेत दीपिकाच्या सर्वात जवळच्या व्यक्ती

दीपिकानं इन्स्टाग्राम स्टोरीत तिचे दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये अनीशा आणि दीपिका एकमेकांना मिठी मारत आहेत. तर दुसरा फोटो दीपिका आणि रणवीरचा आहे. ज्यामध्ये दीपिका रणवीरच्या गालावर किस करत आहे.

दीपिकाच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, ती शकुन बत्राच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दीपिका पहिल्यांदाच सिद्धांत चतुर्वेदीसोबत काम करणार आहे. याशिवाय ती रणवीरच्या ८३ मध्येही काम करत आहे. हा चित्रपट क्रिकेटर कपिल देवच्या जीवनावर अधारित आहे. त्याचबरोबर लवकरच दीपिका अभिनेता हृतिक रोशनबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.