ankita lokhande

अंकिता या फोटो मधे खुप गोड दिसते आहे. तिचा हा पेहेराव मात्र काही नेटकऱ्यांना पटलेला दिसत नाही.

  अभिनेत्री अंकिता लोखंडे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. अंकिता  सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. अंकिता सतत वादग्रस्त कमेंट,फोटो पोस्ट करते ज्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. काही दिवसांपूर्वी अंकिता लोखंडेला तिच्या आगामी मालिका ‘पवित्र रिश्ता २.०’साठी ट्रोल करण्यात आले होते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

  अंकिता सोशल मीडियावर बरेच फोटो पोस्ट करत असते. अंकिताने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटो मध्ये परिधान केलेल्या कपड्यांवरून काही नेटकरी तिला ट्रोल करताना दिसले. अंकिता या फोटोमध्ये गुलाबी रंगाचं टी-शर्ट घालून केस मोकळे ठेवले आहेत. त्या ड्रेसला साजेल असे शूज देखील घातल्याचे दिसत आहेत.अंकिताने शेअर केलेल्या फोटो खाली तिने मी खूप तयार झाले आहे का ? असा प्रश्न देखील विचारला. अंकिता या फोटो मधे खुप गोड दिसते आहे. तिचा हा पेहेराव मात्र काही नेटकऱ्यांना पटलेला दिसत नाही.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

  अंकिताने शेअर केलेल्या या फोटोवर काही चाहत्यांनी हॉट, खूप सुंदर अशी कमेंट केलेली दिसते. तर दुसरी कडे ‘तुला कापड कमी तर नाही पडलं ?’ असा प्रश्न विचारला आहे . अंकिताच्या फोटोवर कमेंट करत एक युजर म्हणाला ‘पॅन्ट कुठे आहे ?’ दुसरा युजर म्हणतो ‘मॅडम,हा ड्रेस विचित्र आहे’.