‘पवित्र रिश्ता’कडून सुशांतला अनोखी श्रद्धांजली, व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी!

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनहून आता अनेक महिने लोटले आहेत. मात्र आजही त्यांच्या आठवणी चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. उत्तम अभिनय आणि प्रत्येकाशी आदबीने वागण्याच्या गुणामुळे सुशांत अनेकांचा लाडका अभिनेता झाला होता. त्यामुळे त्याला विसरणं चाहत्यांना आणि त्याच्या कुटुंबीयांना शक्य नाही. पवित्रा रिश्ता या मालिकेतून घराघरात पोहचलेल्या सुशांतला ‘पवित्र रिश्ता’च्या टीमने अनोख्या अंदाजात श्रद्धांजली वाहिली.

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

हा व्हिडिओ अंकिताने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ बघून तुमच्या डोळ्यात नक्की पाणी येईल.  अंकिता लोखंडेने तिच्या इन्स्टाग्रामवर ‘झी रिश्ते अवॉर्ड 2020’ सोहळ्यातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘पवित्रा रिश्ता’च्या संपूर्ण टीमने सुशांतला खास आणि अनोख्या अंदाजात श्रद्धांजली वाहिली.

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

सुशांतवर चित्रीत करण्यात आलेल्या मालिका व चित्रपटातील गाण्यांच्या माध्यमातून त्याच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या गाण्यांवर अंकिता लोखंडे आणि उषा नाडकर्णी यांनी परफॉर्मेन्स सादर केले. विशेष म्हणजे या परफॉर्मेन्सची सुरुवात ‘साथिया ये तूने क्या किया’ या गाण्यापासून झाली. यावेळी उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यातही पाणी आलं.

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

अंकिताने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. १४ जूनला सुशांतचं राहत्या घरी निधन झालं. त्याच्या निधनामुळे कलाविश्वावर आणि चाहत्यांवर एकच शोककळा पसरली असून अनेक चाहते आजही त्या धक्क्यातून सावरले नाहीत.