ankita lokhande birthday party

अभिनेत्री अंकिता लोखंडेने नुकताच आपला ३६ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी जंगी पार्टी करण्यात आली. या पार्टीचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अंकिता लोखंडेच्या या फोटोजवर सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता सिंह किर्तीने देखील कमेंट केली आहे.

या वाढदिवसाचा एक व्हिडिओ अंकिता लोखंडेने इंस्टाग्रावर शेअर केले आहेत. यावेळी अंकिता केक कापताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याव्हिडिओत अंकिताचे जवळचे मित्र- मैत्रीणी आहेत. यावेळी तिच्या वाढदिवसाला रश्मी देसाईही दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

अंकिताने या खास क्षणाला गोल्डन शाइनिंग आऊटफिट घातलं होतं. ज्यामध्ये अंकिता अतिशय सुंदर दिसत होती. या व्हिडिओत अंकिता डबल लेअरवाला केक कापताना दिसत आहे. यावेळी अंकिताचे मित्रपरिवार देखील दिसत आहेत.

अंकिता हे सेलिब्रेशनचे फोटो अंकिताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,’शुभेच्छा आणि स्वप्न.’ या कमेंटमध्ये अंकिताने एक्स बॉयफ्रेंड आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता सिंह किर्तीने अंकिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘हॅप्पी बर्थ डे ब्युटीफूल’.

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

पार्टीत संदीप सिंह हजर

अंकिताच्या पार्टीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मात्र नेटकऱ्यांनी अंकिता आणि संदिप सिंहला ट्रोल केलं. सुशांत आणि अंकिताचा जवळचा मित्र संदिप सिंह देखील या पार्टीत हजर होता. सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात संदिप सिंह अनेक वेळा वादाच्या भोवऱ्यात सापडला. त्यामुळे त्याचं आंकिताच्या बर्थडे पार्टीत हजर असणं खटकलं.