shilpa shetty

'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडे 'झी रिश्ते अवॉर्ड २०२० च्या तयारीत बिझी आहे. अंकिताने सोशल मीडियावर रिहर्सलचे फोटो आणि व्हीडिओ शेअर केले आहेत. अंकिता लोखंडे एका डान्सच्या माध्यमातून ट्रिब्यूट देणार आहे. याच रिहर्सल दरम्यान अंकिता सुशांतची ऑनस्क्रीन आई उषा नाडकर्णी यांना भेटायला पोहोचली होती.

‘पवित्र रिश्ता’ फेम अंकिता लोखंडे ‘झी रिश्ते अवॉर्ड २०२० च्या तयारीत बिझी आहे. अंकिताने सोशल मीडियावर रिहर्सलचे फोटो आणि व्हीडिओ शेअर केले आहेत. अंकिता लोखंडे एका डान्सच्या माध्यमातून ट्रिब्यूट देणार आहे. याच रिहर्सल दरम्यान अंकिता सुशांतची ऑनस्क्रीन आई उषा नाडकर्णी यांना भेटायला पोहोचली होती. यावेळी दोघीही सुशांतची आठवण काढून इमोशनल झाल्याचे दिसले. या भेटीचा व्हीडिओ अंकिताने शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

 

‘पवित्र रिश्ता’ मालिका संपल्यावर अंकिता लोखंडे आणि उषा नाडकर्णी यांच्यात तशी फारच कमी भेटी झाल्या. अंकिता आणि उषा अनेक वर्षांनी एकमेकींना भेटल्या. अंकिताने व्हीडिओ शेअर करत लिहिले की, ‘आईला बऱ्याच वर्षांनी भेटले. त्या दिवसेंदिवस तरुण होताहेत. एकदम कडक आई..’. आपल्या ऑनस्क्रिन सासू उषा नाडकर्णी यांच्या गोष्टी ऐकून अंकिता लोखंडेचे मनही हलके झाले. अंकिता लोखंडे आणि उषा नाडकर्णी काही तास एकमेकींसोबत गप्पा करत होत्या. अंकितासोबत जुन्या आठवणी ताज्या करता करता उषा नाडकर्णी यांच्या डोळ्यातही पाणी आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

 

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत उषा नाडकर्णी आणि सुशांत सिंह राजपूतने आई-मुलाची भूमिका साकारली होती. अशात सेटवर दोघे जास्तीत जास्त वेळ सोबत घालवत होते. दोघांमध्ये अनेक सीन्स होते. यादरम्यान दोघांचे चांगले नाते तयार झाले होते. सुशांत उषा नाडकर्णी यांचा फार सन्मान करायचा.