सुशांतबरोबरच्या ब्रेकअपनंतर विकी जैन आला अंकिताच्या आयुष्यात, अंकिता बरोबर या सेलिब्रिटींनाही मिळाली प्रेमाची दुसरी संधी

बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे १९ डिसेंबरला आपला वाढदिवस साजरा करतेय. ती ३६ वर्षांची झाली आहे. अंकितासाठी  २०२० हे वर्ष फारसं चांगलं गेलं नाही. कारण अंकिताचा एक्स बॉयफ्रेंड अभिनेता सुशांतसिंग राजपूतने १४ जूनला आत्महत्या केली. यामुळे अंकिताला धक्का बसला कारण ती आणि सुशांत एकमेकांच्या अगदी जवळचे होते. जवळजवळ सात वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांचं २०१६ला ब्रेकअप केलं होता.

बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे १९ डिसेंबरला आपला वाढदिवस साजरा करतेय. ती ३६ वर्षांची झाली आहे. अंकितासाठी  २०२० हे वर्ष फारसं चांगलं गेलं नाही. कारण अंकिताचा एक्स बॉयफ्रेंड अभिनेता सुशांतसिंग राजपूतने १४ जूनला आत्महत्या केली. यामुळे अंकिताला धक्का बसला कारण ती आणि सुशांत एकमेकांच्या अगदी जवळचे होते. जवळजवळ सात वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांचं २०१६ला ब्रेकअप केलं होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

 

अंकिता- सुशांतच्या ब्रेकअपनंतर. सुशांत रिया चक्रवर्तीशी रिलेशलशीपमध्ये होता. तर अंकिताला विकी जैन रूपात दुसरं प्रेम मिळाला. विकी हा व्यवसायाने व्यावसायिक आहे. अंकिताबरोबर त्याच बॉण्डींग खूप खास आहे. कदाचीत पुढील वर्षी हे दोघं लग्नबंधनात अडकू शकतात.

अंकितासारखे अनेक सेलेब्रेटी आहेत ज्यांचे ब्रेकअप झाल्यानंतर त्यांना त्यांचे दुसरे प्रेम मिळाले आहे.

अभिनेत्री आणि बिग बॉस रनरअप सना खान सध्या आपलं लग्न एन्जॉय करतेय. ऑक्टोबरमध्ये तीने एन्टरटेंमेंट इंडस्ट्री सोडणार असल्याचं जाहीर करत सगळ्यांना आश्चर्यचकित केलं. अल्लाहच्या वाटेवर जायचे आहे म्हणून चित्रपट जग सोडून जात आहेत, असे सानाने म्हटले होते. यानंतर थोड्याच दिवसात सनाने सूरतच्या मुफ्ती अनस सय्यदसोबत लग्न करून सर्वांना चकित केलं. नृत्यदिग्दर्शक मेल्विन लुईसबरोबर झालेल्या ब्रेकअपमुळे काही महिन्यांपूर्वीच साना नैराश्यात गेली होती. सनाने मेलविनवर फसवणूक केल्याचा आरोप केला होता. मेलव्हिननंतर सनाला खरं प्रेम मिळालं. आणि ती खूप आनंदित आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saiyad Sana Khan (@sanakhaan21)

 

गायिका नेहा कक्कर हिमांश कोहलीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. जून २०१८ मध्ये नेहा आणि हिमांश यांच्यात जोरदार भांडण झालं. त्यानंतर त्यांच ब्रेकअप झालं. दिल्लीस्थित हिमांशने ‘यारियां’ (२०१४) चित्रपटाद्वारे डेब्यू केला होता. त्यात नेहाने ‘सनी-सनी’ हे गाणे गायलं. या चित्रपटाच्या सेटवर दोघांची मैत्री झाली.

 

८ वर्षांपासून बिपाशा बासूबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असूनही जॉनचे नातं शेवटपर्यंत पोहोचू शकलं नाही. बिपाशाबरोबर झालेल्या ब्रेकअपनंतर त्याने २०१४ मध्ये बँकर प्रिया रुंचलशी लग्न केलं. या दोघांच्या लग्नाला ६ वर्ष झाली होती आणि दोघेही सुखी आयुष्य जगत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Abraham (@priyarunchal)

 

अभिनेत्री प्रिती झिंटाने देखील आपल्यापेक्षा १० वर्षाने लहान असणाऱ्या जीन गुडनिफ या अमेरिकन नागरिकाशी लग्न केलं. २९ फेब्रुवारी २०१६ ला या दोघांनी लॉस एंजलिसमध्ये लग्न केलं. त्यानंतर जवळपास 6 महिन्यांनंतर प्रीती आणि जीनच्या लग्नाचे फोटो समोर आले. याआधी प्रीती व्यवसायिक नेस वाडियाबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. पण काही महिन्यातच त्यांच्यात वाद झाले आणि त्यांच ब्रेकअप झालं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)