सलमानच्या फॅन्ससाठी आणखी एक खुशखबर, सलमान आणि चिरंजीवी झळकणार एकत्र!

चिरंजीवीच्या ६० वा वाढदिवस साजरा करण्यासाठी सलमान प्रायव्हेट विमानानं हैदराबादला गेला होता. तिथं सलमानानं आपल्या अनोख्या शैलीत डान्सही केला होता.

    ‘राधे – युवर मोस्ट वाँटेड भाई’ हा चित्रपट चांगलाच आपटल्यानंतर सलमान खानच्या चाहत्यांना ‘टायगर ३’चे वेध लागले आहेत, पण सध्या या चित्रपटाचं शूटिंग रशियामध्ये सुरू असल्यानं तूर्तास त्यांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे. अशातच सलमानच्या फॅन्ससाठी आणखी एक खुशखबर आली आहे. सलमान हा एक दिलदार मित्र असल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे. बॅालिवूडमध्ये कलाकार-तंत्रज्ञांप्रमाणेच दक्षिणात्य सिनेसृष्टीतही त्याचा मोठा मित्र परिवार आहे.

    सुपरस्टार चिरंजीवी यापैकीच एक आहे. दोघे इतके चांगले मित्र आहेत की चिरंजीवीचा मुलगा रामचरण तेजा जेव्हा मुंबईमध्ये ‘जंजीर’ चित्रपटाचं शूटिंग करत होता, तेव्हा सलमानच्या घरून त्याला लंच जायचा. इतकंच नव्हे तर चिरंजीवीच्या ६० वा वाढदिवस साजरा करण्यासाठी सलमान प्रायव्हेट विमानानं हैदराबादला गेला होता. तिथं सलमानानं आपल्या अनोख्या शैलीत डान्सही केला होता.

    पडद्यामागचं हे नातं आता प्रथमच पडद्यावरही पहायला मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. आता हे दोन मित्र पडद्यावरही एकत्र झळकणार असल्याची माहिती मिळाली आहे. चिरंजीवीच्या लेटेस्ट तेलुगू प्रोजेक्टमध्ये सलमान पाहुण्या कलाकाराच्या रूपात दिसणार असल्याचं समजतं. या अनटायटल चित्रपटाचं दिग्दर्शन मोहन राजा करत आहेत.