क्यूटनेसचा ओव्हरडोस, Video बघून नेटकरी पडले चिमुकल्या अन्वीच्या प्रेमात, आई- लेकीच्या बोबड्या बोलची रंगली चर्चा!

अशुंमनच्या लेकीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

  मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता अंशुमन विचारे हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो त्याची मुलगी अन्वीचे व्हिडीओ आणि फोटो सतत सोशल मीडियावर शेअर  करत असतो. नुकताच अन्वीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये अन्वी तिच्या आईशी बोलताना दिसत आहे. नेटकऱ्यांना चिमुकल्या अन्वीचा आणि आईचा संवाद खूप आवडला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Anshuman Vichare (@anshumanvichare)

  हा व्हिडीओ इतका क्यूट आहे की, चाहते या चिमुकल्या अन्वीच्या अक्षरश: प्रेमात पडले आहेत. आई मी तुला म्हातारी होऊच देणार नाही, असं अन्वी या व्हिडिओत सांगतेय.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Anshuman Vichare (@anshumanvichare)

  अन्वी आणि तिच्या आईचा संवाद – अन्वी काय करतेय, तर आपल्या आईसाठी जेवण बनवतेय. याचदरम्यान मायलेकींचा संवाद सुरु होतो. तू बनवलं माझ्यासाठी जेवायला? असे आई म्हणते. यावर हो, असे अन्वी म्हणते. तू माझी काळजी घेणार मम्मा? माझे लाड करणार? मी म्हातारी झाल्यावर मला सांभाळणार?, अशी आई अन्वीला विचारते. यावर तू म्हातारी होणार मग मी घाबरणार, पण मी म्हातारीला घाबरते. मी तुला म्हातारी होऊच नाही देणार, कारण तू माझी मम्मा आहे आणि तू मला सुंदर दिसते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Anshuman Vichare (@anshumanvichare)

  अशुंमनच्या लेकीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.