मी प्रेग्नंट असले तर? मुलीच्या प्रश्नावर अनुराग कश्यप म्हणाला….,VIDEO होतोय व्हायरल!

“मी यावर विचार करेल, तुला विचारेल की तुला काय हवंय, यावर तुझा जो काही निर्णय असेल, तुला जे काही करायचं असेल त्यात मी तुझ्या निर्णयासोबत असेल….आणि हे तुला माहित आहे.”

    अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. आलियाचं स्वत:च यूट्यूब चॅनल देखील आहे. फादर्स डेच्या निमित्ताने तिनं यूट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये ती वडील अनुराग कश्यपला काही खाजगी प्रश्न विचारताना दिसून येतेय. मात्र या व्हिडीओमधून या बाप-लेकींमध्ये असलेली स्ट्रॉंग बॉण्डिंग दिसून आली.

    या व्हिडीओमध्ये आलिया कश्यपने वडील अनुराग कश्यपला विचारलं, “जर मी प्रेग्नंट झाले आणि तुमच्याकडे येऊन मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली तर तुमची यावर काय प्रतिक्रिया असेल ?” यावेळी अनुराग कश्यप म्हणाला, “मी यावर विचार करेल, तुला विचारेल की तुला काय हवंय, यावर तुझा जो काही निर्णय असेल, तुला जे काही करायचं असेल त्यात मी तुझ्या निर्णयासोबत असेल….आणि हे तुला माहित आहे.”

    अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप सध्या शेन जॉर्जला डेट करतेय. वडीलांशी गप्पा मारताना तिने तिच्या बॉयफ्रेंडबद्दल सुद्धा एक प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना शेन पसंत असल्याचं अनुराग कश्यपने सांगितलं. या व्हिडीओमध्ये अनुराग कश्यप आणखी म्हणतो, “मला तुझ्या मित्र-मैत्रिणीसाठीची आणि विशेष करून मुलांसाठीच्या तुझ्या पसंतीवर खूप विश्वास आहे. शेन खूप चांगला मुलगा आहे. तो खूप आध्यात्मिक आहे. खूप शांत आहे. जे एका ४० वर्षीय पुरूषांमध्ये सुद्धा गुण नसतील असे सगळे गुण त्याच्यामध्ये दिसून येतात. अचडणीचे अनेक प्रसंग तो व्यवस्थित मार्गी लावतो.”