अँजिओप्लास्टीनंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपची झालीये भयंकर अवस्था, फोटो बघून धक्का बसेल!

अलीकडे अनुरागवर अँजिओप्लास्टी करण्यात आली. गेल्या आठवड्यात अनुरागच्या छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्याला रूग्णालयात भरती करण्यात आले हो

    दिग्दर्शक अनुराग कश्यपवर नुकतीच अँजिओप्लास्टी करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतरचा अनुरागचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून सगळ्यानाच धक्का बसला आहे. अनुरागची मुलगी आलिया कश्यप हिने वडिलांचा एक व्हिडिओ इन्स्टास्टोरीवर शेअर केला आहे़ यात अनुरागला ओळखणंही कठीण झालय.

    काय आहे व्हिडिओत

    आलियाने शनिवारी शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अनुरागचे पूर्णपणे टक्कल दिसतेय. त्याच्या गळ्याभोवती काळ्या रंगाचा मास्क आहे, दाढी वाढलेली दिसतेय. आलियाने त्याच्या चेह-यावर झूम करताच, ‘मला काही दिसत नाही’, असे अनुराग पुटपुटताना ऐकू येतो. त्यानंतर काही मुली हसता-खिदळताना पार्श्वभूमीवर ऐकू येतात.

    अलीकडे अनुरागवर अँजिओप्लास्टी करण्यात आली. गेल्या आठवड्यात अनुरागच्या छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्याला रूग्णालयात भरती करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याची ताबडतोब अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ना दिला होता. त्यानुसार ही शस्त्रक्रिया पार पडली होती. यूएसमध्ये शिकत असलेली अनुरागची कन्या आलिया सध्या मुंबईत आहे. सध्या ती आपल्या वडिलांची काळजी घेतेय.