वामिकाचा जन्म होताच विरूष्काच्या घरावरची नेमप्लेट बदलली, सध्या या क्यूट नेमप्लेटची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे!

अभिनेत्री अनुष्का शर्मा ११ जानेवारीला आई झाली. गरोदरपणात तिने आपले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. १ फेब्रुवारीला अनुष्का शर्माने तिच्या मुलीच्या जन्मानंतर पहिले छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले होते

    अभिनेत्री अनुष्का शर्माने जानेवारी महिन्यात एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिने आपल्या लेकीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. विरूष्काने आपल्या लाडक्या लेकीचं नाव वामिका असं ठेवलं आहे. नुकतीच वामिका दोन महिन्यांची झाली आहे. चाहत्यांना अद्याप त्यांच्या लेकीचा पूर्ण चेहरा पाहता आलेला नाही, पण आता वामिका विषयी एक बातमी चर्चेत आली आहे.

    अभिनेत्री अनुष्का शर्मा ११ जानेवारीला आई झाली. गरोदरपणात तिने आपले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. १ फेब्रुवारीला अनुष्का शर्माने तिच्या मुलीच्या जन्मानंतर पहिले छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले होते आणि तिचे नाव चाहत्यांना सांगितले होते. आता विरुष्काच्या घराची नेमप्लेट चर्चेत आली आहे.

    काय आहे नेमप्लेट

    विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत व्यस्त आहे. अशा परिस्थितीत, भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये आहे त्या हॉटेलमध्ये खेळाडूंना घरासारखे वातावरण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा परिस्थितीत त्यांनी नेमप्लेटसह खोलीचे नंबरही बदलले आहेत. कॅप्टन विराटच्या खोलीबाहेर एक खास नेमप्लेट लावण्यात आली आहे. ज्यात विराट, त्याची पत्नी-अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि त्यांची दोन महिन्यांची लेक वामिका अशा तिघांची नावं आहेत.