अनुष्काने विराटला एका फटक्यात उचललं, VIDEO सोशल मीडियावर वेड्यासारखा होतोय व्हायरल!

या व्हिडिओत जेव्हा तिने पहिल्यांदा विराटला उचलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती त्याला सांगते की, तू स्वतःला उचलू नकोस. तर दुसऱ्या प्रयत्नात तिने त्याला अक्षरशः सहज उचललं.

  अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. त्यामुळे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. पण यावेळी मात्र अनुष्काचा एक वेगळाच अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला. यावेळी ती विराटला उचलत आहे. विराट आणि अनुष्काचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

  या व्हिडिओत अनुष्का आपला पती विराट कोहली याला उचलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. एकदा नाही तर दोनदा तिने त्याला उचललंसुद्धा! हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना तुफान आवडला आहे आणि ते तिच्या ताकदीचं कौतुकही करताना दिसत आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

   

  या व्हिडिओत जेव्हा तिने पहिल्यांदा विराटला उचलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती त्याला सांगते की, तू स्वतःला उचलू नकोस. तर दुसऱ्या प्रयत्नात तिने त्याला अक्षरशः सहज उचललं. आणि यानंतर आपले बायसेप्स दाखवले. “मी करुन दाखवलं का?”, असं कॅप्शनही तिने या व्हिडिओला दिलं आहे. तिच्या या प्रश्नाचं उत्तर चाहते देत आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

  वामिकाच्या जन्मानंतर अनुष्काने पुन्हा कामाला सुरुवात केल्याचं दिसत आहे. नुकतंच तिने एका जाहिरातीसाठी चित्रीकरणाच्या वेळचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. जानेवारी महिन्यात अनुष्काने मुलीला जन्म दिला. तिचं नाव ‘वामिका’ असं ठेवलं आहे.