तुमचं प्रेम आणि आशीर्वाद यांसाठी आम्ही खूप आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी, दोघीसुद्धा ठीक आहेत आणि आमचं हे सौभाग्य आहे की आम्हाला आयुष्यात ही गोष्ट अनुभवता आली. यावेळी आम्हाला थोडी प्रायव्हसी हवी असेल हे तुम्ही नक्कीच समजू शकता असं आम्ही समजतो, अशा आशयाची पोस्ट विराटने शेअर केली.
अभिनेत्री अनुष्का शर्माने एका गोड मुलीला जन्म दिला आहे. विराट कोहलीने आपल्या घरी लहान परी आल्याच सांगत ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. ११ जानेवारी २०२१ रोजी ब्रीच कॅण्डी इस्पितळात अनुष्काने बाळाला जन्म दिला. आज सकाळीच अनुष्का आणि विराट नेहमीच्या चेकअपसाठी इस्पितळात गेले होते.
— Virat Kohli (@imVkohli) January 11, 2021
ऑगस्ट महिन्यात विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट करत ती गरोदर असल्याचं सांगितलं होतं. ‘जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार’, असं कॅप्शन देत विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट केला होता. विराट-अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या तीन वर्षांनंतर या दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे.
View this post on Instagram