ऑलमोस्ट सुफळ संपूर्णमध्ये साजरा होणार अप्पांचा ७५वा वाढदिवस

अप्पांचा तिथीनूसार ७५ वा वाढदिवस येतोय म्हणून नचिकेत खास तयारीला जुंपलाय. त्याने अप्पांची आवडती ७५ पुस्तकं आणली आहेत आणि ती अनाथआश्रमाला भेट द्यायचे त्याने ठरवले आहे. शिवाय अप्पांना झाडांची आव़ड असल्याने त्याने ७५ वेगवेगळी रोपं आणून ठेवली आहेत. एकूणच अप्पांचा वाढदिवस त्यांच्या आवडीनूसार आणि कलेनूसार साजरा करण्याची पुर्ण योजना नचिकेतने बनवली आहे.

झीयुवा वाहिनीवरची (Zee Yuva) ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण ही मालिका (Marathi Serial)  प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. या मालिकेच्या आणि कलाकारांच्या  (Actors) वाढत्या चाहतावर्गामुळे कळतं. यातल्या नचिकेत (Nachiket) आणि सई (Sai) या महत्वाच्या व्यक्तिरेखांसोबतच अप्पा केतकर ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी उचलून धरली आहे. शिस्तप्रिय (Disciplin) प्रामाणिक पण तेवढेच प्रेमळ असे अप्पा या मालिकेचा जणू प्राण बनलेत. अशा या लाडक्या आणि आदरणीय अप्पांचा ७५ वा वाढदिवस तिथीनूसार येणार आहे आणि त्याचं सेलिब्रेशन लवकरच तुम्हाला या मालिकेमध्ये पहायला मिळणारे आहे.

अप्पांचा तिथीनूसार ७५ वा वाढदिवस येतोय म्हणून नचिकेत खास तयारीला जुंपलाय. त्याने अप्पांची आवडती ७५ पुस्तकं आणली आहेत आणि ती अनाथआश्रमाला भेट द्यायचे त्याने ठरवले आहे. शिवाय अप्पांना झाडांची आव़ड असल्याने त्याने ७५ वेगवेगळी रोपं आणून ठेवली आहेत. एकूणच अप्पांचा वाढदिवस त्यांच्या आवडीनूसार आणि कलेनूसार साजरा करण्याची पुर्ण योजना नचिकेतने बनवली आहे.

नचिकेतची कुठलीही योजना अडथळ्याशिवाय पुर्ण होईल का ?

पण अप्पांसाठी बनवलेली नचिकेतची कुठलीही योजना अडथळ्याशिवाय पुर्ण होईल इतकं सोप्पं थोडीच असणारे यातही ट्विस्ट येणारच. ते काय असेल ते मात्र तुम्हाला येणाऱ्या भागांमध्ये दिसेलच. तेव्हा पहायला विसरु नका ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण रोज रात्री ८ वाजता फक्त झी युवा वाहिनीवर.