कधी बिकीनी घालून उंटावर फोटोशूट, तर कधी रस्त्यावर धम्माल डान्स या अभिनेत्रीचा दुबईत जलवा!

जॉर्जिया ऍंड्रियानी दुबईमध्ये अ‍ॅड शुट आणि तिच्या आगामी म्युझिक व्हिडिओवर काम करत आहे, आणि लवकरच जॉर्जिया तिचा पहिला चित्रपट "वेलकम टू बजरंगपूर" साठी शूट करणार आहे.

  अभिनेत्री जॉर्जिया ऍंड्रियानी गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये दुबईला रवाना झाली, जिथे ती आपल्या अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. जॉर्जिया सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या चाहत्यांना ती कधीच निराश करत नाही.  जॉर्जिया तिच्या ग्लॅमरस लूकमध्ये फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. स्विमिंग सूट परिधान करून उंटावर बसून फिरणे असो किंवा लक्झरी कार सोबत फोटो असो, सोशल मीडियावरील जॉर्जिया पोस्ट नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे.

   

  जॉर्जिया ऍंड्रियानीने  नुकताच तिचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ‘यो यो हनी सिंग’ आणि ‘नेहा कक्कर’ च्या “नॉटी सैंयाजी” या गाण्यावर दुबईच्या रस्त्यावर आपल्या कोरियोग्राफर बरोबर डान्स करताना दिसत आहे. तीच्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. हा व्हिडिओ चोवीस हजाराहून अधिक लोकांनी पाहिलेला आहे.

  जॉर्जिया ऍंड्रियानी दुबईमध्ये अ‍ॅड शुट आणि तिच्या आगामी म्युझिक व्हिडिओवर काम करत आहे, आणि लवकरच जॉर्जिया तिचा पहिला चित्रपट “वेलकम टू बजरंगपूर” साठी शूट करणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Giorgia Andriani (@giorgia.andriani22)