अर्जुन कपूरने घेतला अलिशान फ्लॅट, तो ही अगदी गर्लफ्रेंड मलायकाच्या शेजारी!

नुकताच अर्जून कपूरने बांद्रात एक फ्लॅट घेतला असून २० ते ३० कोटींच्या दरम्यान त्याची किंमत असल्याचे बोललं जातय. लॉकडाऊनच्या काळात बॉलीवूडमधील स्टार मंडळींनी मालमत्ता खरेदीचा धडाका लावला आहे.

  अर्जुन कपूर आणि मलायकाचे प्रेमप्रकरण जगजाहीर आहे. अरबाझपासून वेगळी झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी अर्जुन आणि मलायका एकत्र दिसतात. ते लवकरच लग्न करणार असल्याचही म्हटलं जातं. नुकताच त्यांनी ३१ डिसेंबर गोव्यात एकत्र साजरा केला. आता हे दोघं पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

  नुकताच अर्जून कपूरने बांद्रात एक फ्लॅट घेतला असून २० ते ३० कोटींच्या दरम्यान त्याची किंमत असल्याचे बोललं जातय. लॉकडाऊनच्या काळात बॉलीवूडमधील स्टार मंडळींनी मालमत्ता खरेदीचा धडाका लावला आहे. अमिताभ बच्चन, सनी लिओनी, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा यांच्या यादीत आता अर्जुन कपूरचाही समावेश झाला आहे. सगळ्यांत प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे मलायकाच्या सोसायटीच्या शेजारीच अर्जुनचा हा नवा फ्लॅट आहे. त्यामुळे तो चर्चेत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

  कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर अर्जुनचे संदीप और पिंकी फरार आणि सरदार का ग्रॅंडसन हे दोन चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाले आहेत. त्यातील सरदार का ग्रॅंडसनला चांगला रिस्पॉन्स मिळाला. आता हे दोघं कधी लग्न करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.