Arsa" Short Film

सर्वोत्कृष्ट लघुपट- आरसा', व 'सर्वोत्कृष्ट परीक्षक पसंती अभिनेत्री पुरस्कार -श्वेता पगार' असे एकूण दोन पुरस्कार या लघुपटाला मिळाले आहेत.अनेक दर्जेदार लघुपटांमधून येथील आशिष निनगुरकर लिखित "आरसा" या लघुपटाने परीक्षकांची विशेष पसंती मिळवली.'आरसा' हा लघुपट कॅन्सर रोगाबद्दल जनजागृती करणारा आहे. या लघुपटाने याअगोदर विविध फेस्टिवलमध्ये अनेक नामांकने व पुरस्कार पटकावले आहेत.तसेच या सर्व फेस्टिवलमध्ये या लघुपटाच्या स्क्रिनिंगला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

सध्या लॉकडाऊनमुळे विविध फिल्म फेस्टिवल (Short Film Festival) ऑनलाइन होत आहेत. त्यातून अनेक नवे विषय, नवीन प्रवाह आणि नवी मांडणी समोर येत आहे. कॅन्सर (Cancer) विषयक सामाजिक प्रबोधनात्मक निर्मिती केलेल्या येथील ‘आरसा’ या सामाजिक लघुपटाला ‘दुर्गापूर इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिवल’ मध्ये “सर्वोत्कृष्ट लघुपट” सहित “परीक्षक पसंती अभिनेत्री पुरस्कार” श्वेता पगार असे एकूण दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत.(“Arsa” Short Film Award at Durgapur International Short Film Festival)

‘सर्वोत्कृष्ट लघुपट- आरसा’, व ‘सर्वोत्कृष्ट परीक्षक पसंती अभिनेत्री पुरस्कार -श्वेता पगार’ असे एकूण दोन पुरस्कार या लघुपटाला मिळाले आहेत.अनेक दर्जेदार लघुपटांमधून येथील आशिष निनगुरकर लिखित “आरसा” या लघुपटाने परीक्षकांची विशेष पसंती मिळवली.’आरसा’ हा लघुपट कॅन्सर रोगाबद्दल जनजागृती करणारा आहे. या लघुपटाने याअगोदर विविध फेस्टिवलमध्ये अनेक नामांकने व पुरस्कार पटकावले आहेत.तसेच या सर्व फेस्टिवलमध्ये या लघुपटाच्या स्क्रिनिंगला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

या लघुपटाचे दिग्दर्शन गणेश मोडक यांनी केले असून संकलन हर्षद वैती यांचे आहे. छायांकन योगेश अंधारे यांचे असून या लघुपटात श्वेता पगार, चैत्रा भुजबळ, संकेत कश्यप,गीतांजली कांबळी व डॉ. स्मिता कासार यांनी भूमिका केल्या आहेत.आशिष निनगुरकर यांनी या लघुपटाचे लेखन केले असून ‘काव्या ड्रीम मूव्हीज (Kavya Dream Movies) व सौ.किरण निनगुरकर’ यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या समजले जाणाऱ्या पश्चिम बंगाल येथे होणाऱ्या तियाशा मुव्हीज निर्मित ‘दुर्गापूर इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल’मध्ये “आरसा” या लघुपटाला एकूण दोन पुरस्कार मिळाल्याने विशेष कौतुक होत आहे.या लघुपटासाठी निर्मिती व्यवस्थापक म्हणून प्रतिश सोनवणे, स्वप्निल निंबाळकर, सिद्धेश दळवी, प्रदीप कडू, अभिषेक लगस, सुनील जाधव,अजित वसंत पवार यांनी काम केले आहे. या लघुपटाचे सहनिर्माते अशोक कुंदप व आशा कुंदप हे आहेत.या पुरस्काराबद्दल काव्या ड्रीम मुव्हीजच्या संपूर्ण टीमचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.