rakhi sawant

बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय कार्यक्रम, कायम वाद, भांडण यामुळे हा शो चर्चेत असतो. लॉकडाऊनमुळे उशीराने सुरू झालेल्या या कार्यक्रम आता शेवटच्या टप्प्यात आहे. हा रिअॅलिटी शो सुरु होऊन आता आठ आठवडे उलटून गेले आहेत. परिणामी शो शेवटच्या टप्प्यात आलेला असतानाच प्रत्येक स्पर्धक ‘बिग बॉस’मध्ये टिकून राहण्यासाठी अटीतटीचा प्रयत्न करताना दिसत आहेत. आता बिग बॉसचं घर म्हटल्यावर रोजची भांडणं ही आलीच.

घरात वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतल्या ड्रामा क्वीन राखी सावंत आणि अर्शी खानमध्ये जोरदार भांडण झालं. यावेळी भांडताना या दोघींनीही मर्यादा ओलांडली. दोघांनीही भांडताना थेट एकमेंकांच्या शरीराबाबत वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

अर्शी आणि राखी या दोन्ही अभिनेत्री आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. परंतु बिग बॉसच्या घरातही वादग्रस्त वक्तव्य करायची संधी या दोघींनीही सोडली नाही. मिळेल तेव्हा, मिळेल तिथे या दोघी भांडत असतात.

काय म्हणाल्या दोघी

खी शोमध्ये आल्यापासून वारंवार अर्शीच्या मेकअपवर निशाणा साधत आहे. तुझं शरीर प्लास्टिक सर्जरी आणि सिलिकॉनने भरलेलं आहे. तुझं नाक खोटं आहे ते कधीही खाली पडू शकतं. तू चेटकीणीसारखी दिसतेस मेकअप करुन काही फायदा नाही असे टोले ती वारंवार अर्शीला देत आहे. परंतु अर्शी देखील कच्च्या गुरुची चेली नाही तिने देखील राखी सावंतच्या प्लास्टिक सर्जरीवर निशाणा साधला. हा शो तरुणांचा आहे तुझ्यासारख्या म्हाताऱ्यांचा नव्हे. असं म्हणत तिने राखीच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील टीका केली.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)