पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एका कलाकाराने अशी वाहिली ‘त्या’ हत्तीणीला श्रद्धांजली

मुंबई:जगभर आज पर्यावरण दिन साजरा होत आहे. हा दिवस साजरा करताना त्याला दुःखाची किनार आहे. मनुष्य मुक्या प्राण्यांशी कसा वागतो हे केरळमधील घटनेने समोर आले आहे. यालाच पर्यावरण दिनाच्या निमित्ताने

मुंबई:जगभर आज पर्यावरण दिन साजरा होत आहे. हा दिवस साजरा करताना त्याला दुःखाची किनार आहे. मनुष्य मुक्या प्राण्यांशी कसा वागतो हे केरळमधील घटनेने समोर आले आहे. यालाच पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वाचा फोडण्यासाठी कलाकार निलेश चौहान यांनी पिंपळाच्या पानावर हत्तीणीचे चित्र कोरून अनोख्या कलाकृतीद्वारे भावनेला वाट मोकळी करून दिली आहे.

पर्यावरणात प्रत्येक प्राण्याचे एक वेगळे अस्तित्व आहे. या अस्तित्वावर घाला घालण्याचे काम अनेक वेळा मनुष्याकडून झाले आहे. या गोष्टी मनुष्याने अद्यापही थांबवलेल्या नाहीत. पर्यावरणाविषयी मनुष्य सजग कधी होणार, हा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे. मुक्या प्राण्यांना मारण्यासाठी मनुष्य क्रूरतेने वागतो. भूकेने व्याकुळ झालेली एक गरोदर हत्तीण जात असताना तिने अननस खाल्ला आणि तो फुटल्याने त्यात मनुष्याने पेरलेल्या फटाक्याचे विषारी रसायन तिच्या शरीरात पसरले आणि असंख्य वेदनांनी तिच्यासह तिच्या गर्भातील जीवाचा मुत्यु झाला. मानव जातीला काळिमा फासणारी ही घटना आहे. अशाप्रकारे क्रूरतेने प्राण्यांना मारणे अमानवी आहे. तरी आपण पर्यावरण दिन साजरा करतोच कसा, अशा प्रश्न निलेश विचारला आहे. याच विवंचनेतून निलेशने एक अननस आणि ते खाण्यासाठी जात असलेली एक भुकेली गरोदर हत्तीण पिंपळाच्या पानावर  कोरली आहे. 
या घटनेने मी अस्वस्थ होतो. पर्यावरण दिन कसा साजरा करावा आणि का करावा हा प्रश्न मी स्वतःला विचारत होतो. त्यातूनच मला ही कलाकृती सुचली आणि हेच त्या मातेला श्रद्धांजली ठरेल निलेशने सांगितले. ‘निसर्गदेवते आम्ही माणूस म्हणून तुझे रक्षण करू शकलो नाही, आम्हाला माफ कर’  असा संदेश ही निलेश यांनी त्यांच्या कलाकृतीतून दिला आहे.