कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी कलाकरांनी तब्बल ७ सात तास केला कार्यक्रम, ५० लाख रूपये करणार दान!

ज्यामध्ये टेक्नो गेमर्स, कुशा कपिला, टेक्निकल गुरुजी, सलोनी, टोटल गेमिंग, आशिष चंचलानी, मिथपाट, कॅरी मिनाटी, विराज घेलानी, अबीश मॅथ्यू, अंकुश बहुगुणा, बीयुनीक, तन्मय भट्ट, रणवीर अलाहबदिया, डॉली सिंग इ. इन्फ्ल्यूएन्सरनी लाईव्ह स्ट्रीममध्ये सहभाग घेतला होता.

    युट्युबर स्ले पॉइंट आणि मिथपाट यांनीभारतातील सर्वात बड्या गेमर आणि प्रभावशाली व्यक्तींच्या साथीने कोविड सहायता निधीकरिता रुपये ५० लाख जमा केले. २५ एप्रिलला साततासाहून अधिक हे युट्युब लाईव्ह स्ट्रीम चालले. या रकमेचा वापर देशात ऑक्सिजन पुरवठ्याकरिता करण्यात येईल. या युट्युब लाईव्ह स्ट्रीमिंगचे होस्ट स्ले पॉइंटने मिथपाटच्या युट्युब चॅनलवरून केले.

    ज्यामध्ये टेक्नो गेमर्स, कुशा कपिला, टेक्निकल गुरुजी, सलोनी, टोटल गेमिंग, आशिष चंचलानी, मिथपाट, कॅरी मिनाटी, विराज घेलानी, अबीश मॅथ्यू, अंकुश बहुगुणा, बीयुनीक, तन्मय भट्ट, रणवीर अलाहबदिया, डॉली सिंग इ. इन्फ्ल्यूएन्सरनी लाईव्ह स्ट्रीममध्ये सहभाग घेतला होता.

    साडेसात तासांपर्यंत चाललेले हे प्रदीर्घ लाईव्ह स्ट्रीम सेशन आयपीएलच्या दिवशी असल्याने या लोकप्रिय व्यक्तींच्या या प्रयत्नाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. 10M+ टोटल व्ह्यूज मिळवून दिले आणि त्याचवेळी २०० हाजारांची ची व्ह्यूवरशीप मिळाली. या लाईव्ह स्ट्रीमदरम्यान इन्फ्ल्यूएन्सर ऑनलाईन गेम खेळत होते आणि महासाथीविषयी जागरूकताही निर्माण करत होते. या उपक्रमाद्वारे जमा झालेली रक्कम हेमकुंत फाउंडेशनला दान करण्यात येईल. ही संस्था देशातील कोविड रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात मदत करते आहे.

    या उपक्रमाविषयी बोलताना युट्युबर स्ले पॉइंट म्हणाला की: “देशात प्राणवायूचा पुरवठा होण्याकरिता आम्ही हा दान उपक्रम राबवला, तो यशस्वी ठरल्याने ही आमच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. आमचे भागीदार हेमकुंत फाउंडेशन यांच्या साथीने एखाद्याच्या मदतीला धावून जाण्याचा आणि त्यांना शक्य तितकी मदत करण्याचे आमचे ध्येय होते. आम्हाला फार आनंद वाटतो. या उपक्रमाकरिता त्यांनी नोंदवलेल्या पाठींब्यासाठी आम्ही युट्युब आणि निर्माता समूह यांचे आभार व्यक्त करतो.