आर्यन खानच्या याचिकेवर थोड्याच वेळात सुनावणी, शाहरुख खान उच्च न्यायालयात पोहोचण्याची शक्यता

काल मंगळवारी मुंबईच्या उच्च न्यायालयात आर्यन खानवर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुनावणी सुरू होती. परंतु माजी अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी न्यायाधीश नितीन सांब्रे यांच्यापुढे युक्तीवाद केला. एनसीबीने मांडलेली थियरी फेटाळून लावत, आर्यन गुन्हेगार नसल्याचा दावा त्यांनी कोर्टात केला. दरम्यान, काल कोर्टाच्या सुनावणीची वेळ संपल्यामुळे आज पुन्हा एकदा आर्यनच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

    मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan Cruise Drugs Case) बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खानचा (Shah Rukh Khan ) मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan Bail) याचिकेवर आज(बुधवार) सुनावणी होणार आहे. काल मंगळवारी मुंबईच्या उच्च न्यायालयात आर्यन खानवर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुनावणी सुरू होती. परंतु माजी अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी न्यायाधीश नितीन सांब्रे यांच्यापुढे युक्तीवाद केला. एनसीबीने मांडलेली थियरी फेटाळून लावत, आर्यन गुन्हेगार नसल्याचा दावा त्यांनी कोर्टात केला. दरम्यान, काल कोर्टाच्या सुनावणीची वेळ संपल्यामुळे आज पुन्हा एकदा आर्यनच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. आज उच्च न्यायालयाने सुनावणीचे आदेश दिले असून आर्यन खानला दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    शाहरुख खान उच्च न्यायालयात पोहोचण्याची शक्यता

    आर्यनचा जामीन सतत फेटाळून लावत असल्यामुळे आर्यनचे वडील बॉलिवूड किंग खान शाहरूख सुद्धा उच्च न्यायालयात पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उच्च न्यायालयातून आजतरी आर्यनला जामीन मिळेल, अशी आशा शाहरूखला आहे. त्यामुळे आर्यनला जामीन मिळणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.