आर्यन खानची आजची रात्रही कोठडीत, उद्या पुन्हा एकदा सुनावणीची शक्यता

एनसीबीने विशेष एनडीपीएस न्यायालयात आपले उत्तर दाखल केले. यामध्ये एनसीबीने आर्यनच्या जामिनाला विरोध करत असे म्हटले आहे की, एका आरोपीची भूमिका दुसऱ्यापासून वेगळी करता येत नाही. आरोपीकडून (आर्यन खान) कोणतीही पुनर्प्राप्ती झाली नाही, तरीही तो या संपूर्ण कटात सामील आहे.

    बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर आजही सत्र न्यायालयात निर्णय होऊ शकलेला नाहीये. न्यायालयाने सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब केली आहे. उद्या खंडपीठ पुन्हा एकदा सुनावणी घेण्याची शक्यता आहे. इतर तीन आरोपी मोहक जैस्वाल, अजित कुमार आणि नुपूर सतिजा यांच्या जामीन अर्जावर आता २० ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

    तत्पूर्वी एनसीबीने विशेष एनडीपीएस न्यायालयात आपले उत्तर दाखल केले. यामध्ये एनसीबीने आर्यनच्या जामिनाला विरोध करत असे म्हटले आहे की, एका आरोपीची भूमिका दुसऱ्यापासून वेगळी करता येत नाही. आरोपीकडून (आर्यन खान) कोणतीही पुनर्प्राप्ती झाली नाही, तरीही तो या संपूर्ण कटात सामील आहे.

    एनसीबीने आपल्या उत्तरात आर्यनला प्रभावशाली व्यक्ती म्हटले आहे. तो पुराव्यांशी छेडछाड करू शकतो, असे एनसीबीकडून सांगण्यात आले. तपास यंत्रणेने सांगितले की, हे स्पष्ट आहे की आरोपी अचित कुमार आणि शिवराज हरिजन यांनी आरोपी आर्यन खान आणि अरबाज मर्चंटला चरस पुरवला. आर्यन आणि अरबाज एकमेकांशी संबंधित आहेत.