aryan khan

आर्यन खानचे(Aryan Khan Arrest) वकील सतीश मनेशिंदे(Satish Maneshinde) न्यायालयात म्हणाले की, आर्यनला पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. आर्यनकडे बोर्डिंग पास नव्हता आणि कोणतीही सीट किंवा केबिन नव्हते. (Mumbai Cruise Drugs Case)तसेच जप्ती करताना त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्स सापडले नाहीत.

    अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला(Aryan Khan Arrested) अटक करण्यात आली आहे. वैद्यकीय चाचणी झाल्यावर एनसीबीने आर्यन खान, त्याचा मित्र आरबाज मर्चंट आणि फॅशन डिझायनर मुनमुन धमेचा यांना न्यायालयात हजर(Aryan Khan Will Be Present In Court) केले. तसेच या प्रकरणातील पुरावे सादर करत त्यांच्या कोठडीची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने आर्यन खानला एक दिवसाची एनसीबी कोठडी (NCB )सुनावली आहे. या प्रकरणात आज आर्यनला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

    आर्यन खानचे वकील सतीश मनेशिंदे न्यायालयात म्हणाले की, आर्यनला पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. आर्यनकडे बोर्डिंग पास नव्हता आणि कोणतीही सीट किंवा केबिन नव्हते. तसेच जप्ती करताना त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्स सापडले नाहीत. त्याला फक्त चॅट्सच्या आधारावर अटक करण्यात आली आहे. तसंच मनेशिंदे आज न्यायालयासमोर आर्यनसाठी जामीनाचा अर्ज करणार आहेत.

    एनसीबीने शनिवारी रात्री गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापा टाकला. दिल्लीतील एका इव्हेंट कंपनीने २, ३ आणि ४ ऑक्टोबर रोजी प्रवासी क्रूज जहाजांवर पार्टी आयोजित केल्याचे मानले जाते. एनसीबी आणि कॉर्डेलिया क्रुझचे अध्यक्ष आणि सीईओ बेलोम यांचे वक्तव्य देखील नोंदवले आहे.

    बेलोम म्हणाले की,  “एनसीबीने आम्हाला क्रू ऑपरेशनची प्रक्रिया समजून घेण्यासाठी बोलावले आणि आम्ही एनसीबीला सहकार्य करत आहोत. मुंबई किनाऱ्यावरून जहाज निघाले तेव्हा सुमारे १,००० प्रवासी होते. ते पुढे म्हणले “आमचे जहाज ताब्यात घेण्यात आले नाही, ते त्याच्या पुढच्या थांबा साठी पुढे गेले आहे आणि सोमवारी परत येईल. आयोजक वेगळे असल्याने जहाजावर असलेल्या पाहुण्यांची आम्हाला माहिती नव्हती.”

    दरम्यान या प्रकरणाच्या बॉलिवूड कनेक्शनची चौकशी सुरु असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले आहे.