वकील ‘भांडत राहिले’अन् आर्यन खानला वेळ कमी पडला ; नक्की काय झालं?

काल आणि आज असे दोन दिवस सेशन कोर्टात शाहरुखच्या वकिलांनी आर्यनला सोडविण्याचा प्रयत्न केला. दोन दिवस दोन्ही पक्षाचे वकील भांडत राहिले परंतू आर्यन खानला आणखी पाच दिवस तुरुंगात रहावे लागणार आहे. कधी किस्पटासारखा कचरा न पाहिलेल्या आर्यन खानला तुरुंगात रहावे लागत आहे.

    आर्यन खानच्या (Aryan Khan) अडचणी वाढत चालल्या आहेत. त्याच्या जामिनासाठी शाहरुख खान खूप तसदी घेत आहे. परंतु आर्यन खान काही बाहेर येत नाहीये. शाहरुखने एकसोएक वकील दिले आहेत. सलमानने त्याचा विश्वासू वकील शाहरुखच्या मदतीला दिला आहे. तरी सरकारी वकील आणि एनसीबी (NCB) त्यांच्यावर भारी पडली आहे.

    काल आणि आज असे दोन दिवस सेशन कोर्टात शाहरुखच्या वकिलांनी आर्यनला सोडविण्याचा प्रयत्न केला. दोन दिवस दोन्ही पक्षाचे वकील भांडत राहिले परंतू आर्यन खानला आणखी पाच दिवस तुरुंगात रहावे लागणार आहे. कधी किस्पटासारखा कचरा न पाहिलेल्या आर्यन खानला तुरुंगात रहावे लागत आहे.

    दोन्ही बाजुच्या वकीलांनी युक्तीवाद एवढा वेळ केला की अखेर कोर्टाकडे निकाल देण्यासाठी विचार करण्यास वेळ उरला नाही. यामुळे दसरा, शनिवार, रविवारच्या सुट्या असल्याने कोर्टाने निकाल थेट 20 तारखेलाच देण्याचे जाहीर केले.

    आर्यन खानच्या वकिलांचा युक्तीवाद..

    आर्यन खानच्या वकिलांनी एनसीबीचे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले. ज्या व्हॉट्सअॅप चॅटचा हवाला देण्यात आला आहे, ते एक रचलेले षडयंत्र आहे. आजच्या मुलांची भाषा आणि इंग्रजी खूप वेगळी आहे. त्यांचे बोलणे .यामुळे संशयास्पद वाटू शकते, असे वकील देसाई म्हणाले.